लोणी काळभोर, (पुणे) : पूर्व हवेलीतील लोणी काळभोर, कदमवाकवस्ती, डोगरगाव व थेऊर परिसरात संध्याकाळचे सात वाजले, तरी आणखी मतदान सुरुच आहे. निवडणूक अधिकारी व पोलिसांनी मतदान केंद्राच्या आत असणाऱ्या सर्वांना उशीर झाला तरी मतदान पूर्ण होईल, याची खात्री देऊन शक्य तिथे मुख्य प्रवेशद्वार बंद केले आहे.
सहा वाजता प्रवेशद्वार बंद झाल्यानंतरही अनेक स्त्री-पुरूष मतदार, मतदान केंद्राबाहेर पोलिसांना आत सोडण्याची विनंती करीत होते. परंतु, त्यांना प्रवेश नाकारण्यात आला. मतदान करण्यासाठी सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत तब्बल अकरा तासांचा अवधी दिलेला असतानाही मतदारांनी शेवटच्या क्षणी गर्दी केली होती.
दरम्यान, परिसरातील नागरिक कामाला गेलेले व कामावरून परत येणाऱ्या नागरिकांनी सायंकाळी 5 वाजल्याच्या नंतर मतदान केंद्राच्या बाहेर मोठी गर्दी केली होती.