उरुळी कांचन, (पुणे) : उरुळी कांचन (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील ‘तारा हॉटेल’च्या पाठीमागे असलेल्या एका विहिरीमध्ये एका अंदाजे 35 ते 40 वर्षे वयाच्या अज्ञात पुरुषाचा मृतदेह आढळून आला आहे. या घटनेमुळे उरुळी कांचन आणि परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेली प्राथमिक माहिती अशी की, सोमवारी (ता. 25) ग्रामपंचायत हद्दीतील तारा हॉटेलच्या पाठीमागे असलेल्या विहिरीच्या पाण्यात एक मृतदेह तरंगताना दिसून आला. नागरिकांनी तात्काळ या घटनेचे गांभीर्य ओळखून उरुळी कांचन पोलिसांना या संदर्भात माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच उरुळी कांचन पोलिसांचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पुढील कार्यवाही सुरु झाली आहे.







