Saturday, July 25, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

आंबवणे येथे बेपत्ता महिलेचा नदीपात्रात मृतदेह आढळला; परिसरात शोककळा

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Wednesday, 10 June 2026, 9:47

विशाल शिंदे

राजगड: राजगड (वेल्हे ) तालुक्यातील आंबवणे गावातील बेपत्ता असलेल्या महिलेचा मृतदेह नदीपात्रात आढळून आल्याने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. सौ. मीरा सुनील ननावरे (वय ३५, रा. आंबवणे, ता. वेल्हा) या दि. ७ जून रोजी सकाळी घरातून बाहेर पडल्यानंतर बेपत्ता झाल्या होत्या. त्यांच्या बेपत्ता झाल्याची तक्रार वेल्हे पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. मात्र, मंगळवारी (दि. ९ जून) सायंकाळी पाच ते सहा वाजण्याच्या दरम्यान आंबवणे हद्दीतील नदीपात्रात त्यांचा मृतदेह आढळून आला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. ७ जून रोजी सकाळी सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास मीरा ननावरे या कोणालाही काहीही न सांगता घरातून निघून गेल्या होत्या. त्या घरी परत न आल्याने पती सुनील लक्ष्मण ननावरे यांनी नातेवाईक, मित्रपरिवार तसेच आसपासच्या गावांमध्ये त्यांचा शोध घेतला. मात्र कोणतीही माहिती न मिळाल्याने दि. ८ जून रोजी वेल्हे पोलीस ठाण्यात त्यांच्या बेपत्ता असल्याची अधिकृत तक्रार दाखल करण्यात आली होती.

 

दरम्यान, मंगळवारी सायंकाळी आंबवणे गावच्या हद्दीतील नदीपात्रात एका महिलेचा मृतदेह असल्याची माहिती मिळताच हवेली आपत्ती व्यवस्थापन पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पथकाने आवश्यक सुरक्षेची काळजी घेत मृतदेह नदीपात्रातून बाहेर काढून वेल्हे पोलिसांच्या ताब्यात दिला.

मृतदेह बराच काळ पाण्यात राहिल्याने तो पूर्णपणे खराब झालेला होता. त्यामुळे चेहऱ्यावरून ओळख पटणे शक्य नव्हते. नातेवाईकांनी अंगावरील कपडे व इतर वस्तूंवरून मृतदेहाची ओळख मीरा ननावरे यांची असल्याचे निश्चित केले. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी वेल्हे ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला.

या बचाव मोहिमेत हवेली आपत्ती व्यवस्थापन पथकातील तानाजी भोसले, वैभव भोसले, संदीप सोलस्कर, संजय चोरघे आणि उत्तम पिसाळ यांनी सहभाग घेतला. त्यांच्या मदतीने मृतदेह सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आला.

पोलीस या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास करत असून शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.

 

“सौ. मीरा ननावरे यांच्या बेपत्ता असल्याची तक्रार वेल्हे पोलीस ठाण्यात यापूर्वीच दाखल झाली होती. आज त्यांचा मृतदेह आंबवणे परिसरातील नदीपात्रात आढळून आला आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला असून अहवाल प्राप्त झाल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल. प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.”
— किशोर शेवते, सहाय्यक पोलीस निरीक्षक, वेल्हे पोलीस ठाणे

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

नीट पेपरफुटीपाठोपाठ शिक्षणात आणखी एक महाघोटाळा! १९० कोटींच्या बनावट ‘शालार्थ आयडी’ प्रकरणी माजी शिक्षणाधिकाऱ्यांना अटक

Friday, 24 July 2026, 22:58

सोशल मीडियाची मैत्री पडली महागात! शिक्षिकेच्या घरातून १४ लाखांचा ऐवज लांबवून प्रियकर पसार

Friday, 24 July 2026, 22:23

पावसाचा जोर ओसरणार की संकट कायम? राज्यात ३ ठिकाणी ‘ऑरेंज’ तर ७ जिल्ह्यांत ‘यलो’ अलर्ट जारी!

Friday, 24 July 2026, 21:43

पेपरफुटी करणाऱ्यांना आता १० वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा अन् १० कोटींचा दंड! कॅबिनेटचा सर्वात मोठा निर्णय

Friday, 24 July 2026, 21:02

शिरूरमधील प्रकार! खरेदीच्या बहाण्याने सराफ दुकानात शिरल्या अन् चार महिलांनी हातचलाखीने दागिने लांबवीले….

Friday, 24 July 2026, 20:19

पत्नीचे उत्पन्न जास्त असेल तर पोटगीचा अधिकार नाही! मुंबई उच्च न्यायालयाचा ऐतिहासिक आणि मोठा निर्णय

Friday, 24 July 2026, 19:36
Next Post

इराण-अमेरिका युद्ध पुन्हा भडकले! अमेरिकेने इराणच्या 20 ठिकाणांवर केला हल्ला

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.