BJP News : पुणे : भाजपने पुणे ग्रामीणसाठी पहिल्यांदाच दोन जिल्हाध्यक्ष दिले आहेत. पुणे ग्रामीण बारामतीसाठी वासुदेव काळे आणि मावळसाठी शरद बुट्टे-पाटील यांची जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. बुट्टे-पाटील हे पुणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आहेत. BJP News
गेल्या काही महिन्यांपासून भाजपचे पुणे जिल्हाध्यक्ष बदलणार अशी चर्चा सुरू होती. अखेर बुधवारी (ता. १९) सकाळी प्रदेश कार्यालयाकडून यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली. भाजपची राज्य कार्यकारिणी ५ मे रोजी जाहीर झाल्यानंतर राज्यातील जिल्हाध्यक्ष, शहराध्यक्ष १५ मे आणि नंतर २० मे पर्यंत जाहीर होतील, असे सांगण्यात आले होते. त्यानंतरही नियुक्त्या झाल्या नव्हत्या. ‘मोदी @9’ या मोहिमेमुळे या नेमणुकांना ब्रेक लागला होता. अखेरीस नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. BJP News
महाराष्ट्रातील सर्व नवे जिल्हाध्यक्ष आणि शहराध्यक्ष जाहीर केले जातील असे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ३० जूनला सांगितले होते. मात्र ही मुदत देखील उलटून गेली. अखेर बुधवारी (ता. १९) सकाळी प्रदेश कार्यालयाकडून राज्यातील नवे जिल्हाध्यक्ष आणि शहर देशांची यादी जाहीर करण्यात आलेली आहे.
यामध्ये पुणे शहराची जबाबदारी धीरज घाटे यांच्याकडे देण्यात आली आहे. दरम्यान गेल्या काही महिन्यांपासून धीरज घाटे यांचे नाव शहराध्यक्ष पदासाठी चर्चेत होते आणि कार्यकर्ते पदाधिकारी यांच्याकडून ही देखील घाटे यांचे नाव अंतिम झाल्याचे सांगितले जात होते. त्यामुळे अपेक्षेप्रमाणे आज घाटे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली.