Thursday, June 25, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

बारामतीत ‘बिग बुल’चा मोठा घोटाळा! १० ते १५ टक्के परताव्याचे आमिष दाखवून फसवणूक; दोघांवर गुन्हा दाखल

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Wednesday, 24 June 2026, 16:39

बारामती, (पुणे) : शेअर मार्केट, फॉरेक्स ट्रेडिंग आणि निश्चित परताव्याच्या आमिषाने गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी बारामती शहर पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कार्तिक अरविंद नाळे, गौरव अरविंद नाळे, BIG BULL INSTITUTE OF TRADING & FINANCE आणि BIG BULL TRADING COMPANY यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आणखी अनेक गुंतवणूकदार फसवणुकीचे बळी ठरले असण्याची शक्यता व्यक्त करत पोलिसांनी नागरिकांना पुढे येण्याचे आवाहन केले आहे. बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. 249/2026 अन्वये भारतीय न्याय संहिता, 2023 मधील कलम 316(2), 318, 340 सह 3(5) तसेच महाराष्ट्र ठेवीदारांच्या हितसंरक्षण अधिनियम, 1999 च्या कलम 3 अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी स्वतःला शेअर मार्केटमधील अनुभवी ट्रेडर, गुंतवणूक तज्ज्ञ तसेच SEBI मान्यताप्राप्त व्यक्ती असल्याचा आभास निर्माण करून नागरिकांना विविध गुंतवणूक योजनांमध्ये सहभागी होण्यासाठी प्रवृत्त केल्याचा आरोप आहे. काही गुंतवणूकदारांना दरमहा 10 ते 15 टक्के निश्चित परतावा, मूळ रक्कम सुरक्षित राहील तसेच तोटा झाल्यास जबाबदारी स्वतः घेण्याची आश्वासने देण्यात आल्याचेही तपासात समोर आले आहे.

 

UPI, NEFT, RTGS, IMPS, बँक ट्रान्सफर किंवा धनादेशाद्वारे पैसे दिलेल्या व्यक्तींनी संबंधित पुराव्यांसह बारामती शहर पोलीस ठाण्यात तात्काळ संपर्क साधावा, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड आणि प्रभारी पोलीस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक रत्नदीप भंडारे करीत आहेत.

पोलिसांच्या हाती बँक व्यवहार, करारनामे, धनादेश, इलेक्ट्रॉनिक संदेश आणि इतर महत्त्वाचे पुरावे लागले असून अनेक गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणावर रक्कम गुंतविल्याचे उघड झाले आहे. ‘बिग बुल’च्या माध्यमातून गुंतवणूक केलेल्या सर्वांनी पुढे यावे, असे आवाहन बारामती शहर पोलिसांनी केले आहे.

दरम्यान, फसवणूकग्रस्तांना न्याय मिळवून देणे आणि या प्रकरणातील संपूर्ण सत्य समोर आणणे हेच बारामती शहर पोलीस ठाण्याचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. तसेच नागरिकांनी दिलेली माहिती आणि कागदपत्रांची गोपनीयता राखली जाईल, असेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

 

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

केतनला संपवण्याचा प्लॅन चेतनचाच! ‘हत्येचा पहिला प्रयत्न फसला तेव्हा चेतन रात्रभर रडला” सियाचा धक्कादायक जबाब…

Thursday, 25 June 2026, 19:38

कदमवाकवस्ती येथे विहिरीत उडी मारून विवाहितेची आत्महत्या

Thursday, 25 June 2026, 19:18

खासदारांच्या फुटीच्या चर्चांना शरद पवारांचा ‘फुलस्टॉप’; बारामतीत राजकीय वातावरणावर स्पष्ट प्रतिक्रिया

Thursday, 25 June 2026, 18:56

मुख्याध्यापकाकडून नववीत शिकणाऱ्या १५ वर्षीय विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार

Thursday, 25 June 2026, 18:52

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी पोलिसांचा ‘सुरक्षा संकल्प’; 100 पेक्षा जास्त शाळा प्रतिनिधींची बैठक: पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांचे आवाहन

Thursday, 25 June 2026, 18:47

‘लोहगड’ युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत! सर्पाकार दरवाजे आणि विंचूकाटा रचनेचा इतिहास उलगडला

Thursday, 25 June 2026, 17:44
Next Post

लग्न नको होतं, पण पळूनही जायचं नव्हतं, आम्ही हत्या केली कारण...; आरोपींनी सांगितलं धक्कादायक कारण

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.