उरुळी कांचन, (पुणे) : राज्यात सद्या विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. त्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. अशातच पुणे जिल्ह्यातील पूर्व हवेलीतुन मोठी बातमी समोर आली आहे. पूर्व हवेलीतून एका बड्या राजकीय नेत्यासह आठ प्लॉटिंग व्यवसायिकांवर आयकर विभागाने छापे टाकल्याची माहिती मिळत आहे.
तसेच शिरूर तालुक्यातील एका सावकारावर देखील छापे टाकल्याचे पुढे येत आहे. दरम्यान, आयकर विभागाकडून पुढील कारवाई सुरु असून याबाबतची अधिक माहिती थोड्याच वेळात समोर येण्याची शक्यता आहे.