Tuesday, September 1, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Baramati: बारामती पोटनिवडणुक बिनविरोध?  पार्थ पवार राज्यसभेसाठी उमेदवार… 

Santosh Mundeby Santosh Munde
Wednesday, 25 February 2026, 10:43

बारामती : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने हालचाली वेगाने सुरू केल्या आहेत. विशेष संक्षिप्त मतदारयादी पुनर्परीक्षण कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून 1 जानेवारी 2026 पर्यंत नोंद असलेले मतदारच या पोटनिवडणुकीत मतदान करू शकणार आहेत. तर राज्यसभा निवडणुकीसाठी पार्थ पवार यांना उमेदवारी देण्याचा महत्त्वाचा निर्णयही पक्षाच्या कोअर कमिटीने घेतल्याची माहिती आहे. (Baramati)

या मतदारसंघाची अंतिम मतदारयादी 10 मार्च रोजी प्रसिद्ध होणार आहे. प्रारूप यादी जाहीर झाल्यानंतर कोणत्याही क्षणी निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान, बारामती पोटनिवडणुकीसाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे नाव जवळपास निश्चित झाल्याची माहिती समोर आली आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर निर्माण झालेल्या सहानुभूतीच्या पार्श्वभूमीवर पक्षाने ही निवडणूक बिनविरोध करण्यावर भर देण्याची भूमिका घेतल्याचे सूत्रांनी सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर कमिटीच्या बैठकीत पोटनिवडणूक लढविण्याबाबत एकमत झाल्याचे समजते.

पार्थ पवार राज्यसभेच्या रिंगणात

आगामी राज्यसभा निवडणुकीसाठी पार्थ पवार यांना उमेदवारी देण्याचा महत्त्वाचा निर्णयही पक्षाच्या कोअर कमिटीने घेतल्याची माहिती आहे. सोमवारी रात्री मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आयोजित बैठकीत या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. ही बैठक प्रफुल पटेल यांच्या मुंबईतील निवासस्थानी पार पडली.

 

बैठकीला प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासह कोअर कमिटीचे सदस्य उपस्थित होते. तसेच 26 फेब्रुवारीला होणाऱ्या राष्ट्रीय अध्यक्ष निवडीसंदर्भातील राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीच्या तयारीवरही चर्चा झाल्याचे कळते.

येत्या काही दिवसांत वरळी डोम येथे पक्षाची राष्ट्रीय कार्यकारिणी बैठक होणार असून, त्यामध्ये सुनेत्रा पवार यांच्या नावावर राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून औपचारिक शिक्कामोर्तब होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींना त्यामुळे वेग आला आहे.

Santosh Munde

Santosh Munde

संतोष मुंडे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून (रानडे इन्स्टिट्यूट) पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. पुण्यातील नामवंत कोचिंग क्लासेससाठी स्क्रिप्ट रायटर आणि अँकर तसेच 'सोशल मीडिया मॅनेजर' म्हणून दोन वर्ष कार्यरत. वेब डेव्हलपमेंट आणि SEO एक्स्पर्ट. जानेवारी 2025 पासून 'पुणे प्राईम न्यूज' मध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत.

ताज्या बातम्या

पुणेकरांची प्रतिक्षा संपली! गणेशोत्सवाचे औचित्य साधून हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोचा पहिला टप्पा धावणार

Tuesday, 1 September 2026, 17:08

मेडिकल क्षेत्रात उरुळी कांचनच्या डॉ. अस्मिता ज्युनिअर कॉलेजचा डंका ; समृद्धी भागेपल्ले अन् प्रथमेश राऊतला थेट ‘MBBS’ला प्रवेश

Tuesday, 1 September 2026, 16:36

ऑपरेशन टायगरची चर्चा! मातोश्रीवर ठाकरेंची तातडीची बैठक अन् महेश सावंतांचा खळबळजन खुलासा; म्हणाले ‘त्यांचे काही लोकं आम्हाला संपर्क…

Tuesday, 1 September 2026, 16:25

CJPचा यू-टर्न! 5 सप्टेंबरचं दिल्लीतील आंदोलन अखेर मागे;आंदोलनकर्त्यांचा मोठा निर्णय

Tuesday, 1 September 2026, 15:52

MPSCचा वरिष्ठ अधिकारीच पेपरफुटीचा मास्टरमाइंड? स्वतःच्या पुतण्यासाठीच पेपर फोडल्याचा आरोप; ५० लाखांत पेपर घेतला अन् १० लाखांना पुढे सरकवला

Tuesday, 1 September 2026, 15:25

फडणवीस सरकारचा मोठा मास्टरस्ट्रोक! कॅबिनेटचे 4 धडाकेबाज निर्णय; 2029 पर्यंत महाराष्ट्र होणार ‘नशामुक्त’

Tuesday, 1 September 2026, 15:19
Next Post

India vs Zimbabwe: दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पराभवानंतर भारतीय संघाच्या अडचणीत वाढ; सेमीफायनलसाठी झिम्बाब्वे विरुद्ध किती रनांनी अन् किती षटकांत विजय मिळवावा लागणार?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp