उरुळी कांचन, (पुणे) : चारचाकी गाड्या चोरणाऱ्या एका आंतरजिल्हा टोळीच्या अट्टल म्होरक्याला स्थानिक गुन्हे ग्रामीण व शिरूर पोलिसांच्या पथकाने देऊळगाव राजा (जि. बुलढाणा) येथून अटक केली आहे. त्याच्याकडून 11 लाख रुपयांच्या 2 चारचाकी गाड्या जप्त करण्यात आला आहे. अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली. नदीम दाउद शेख (वय – 32, रा. मु. पो. धाड ता. जि. बुलढाणा, सध्या रा. कुंबेफळ जालना रोड, छत्रपती संभाजी नगर) याला देऊळगाव राजा येथून ताब्यात घेण्यात आले.
जिल्हा पोलीस अधिक्षक पंकज देशमुख यांनी दिलेल्या माहितीनुसार, शिरूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून 26 ऑगस्टला एक पांढरे रंगाची इरटीगा चारचाकी चोरी गेली होती. याबाबत गाडी मालक योगेश आनंदा गुंड रा. बाबुराव नगर, शिरूर, (ता. शिरूर) यांनी चोरीची फिर्याद पोलीस ठाण्यात दिली होती.
सदर गुन्हयाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस करीत असताना सी.सी.टी.व्ही. फुटेज तपासणेत आले चोरी गेलेले वाहन हे अहमदनगर बाजुकडे गेल्याचे निष्पन्न झाले. तसेच अशा प्रकारचे गुन्हे करणारा सराईत गुन्हेगार नदीम शेख यानेच सदरचा गुन्हा केला असल्याचा संशय पोलिसांना होता. त्यानुसार खबऱ्याने माहिती दिली की, शिरूर परिसरात चारचाकी वाहनांची चोरी नदीम शेख यानेच केली असून तो देऊळगाव राजा येथे ईरटीगा कार आहे.
मिळालेल्या माहितीच्या अनुशंघाने गुन्हे शाखेचे व शिरूर पोलीस ठाण्यातील पोलिसांच्या पथकाने आरोपी नदीम शेख याला देऊळगाव राजा येथून ताब्यात घेतले. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने शिरूर पोलीस ठाण्यातील 2 व नगर जिल्ह्यातील 1 असा तीन गुन्हे केल्याची कबुली पोलिसांना दिली. त्याच्याकडून पोलिसांनी 11 लाख 40 हजार रूपये किंमतीच्या दोन चारचाकी गाड्या जप्त केल्या आहेत. तसेच सदरचे गुन्हे त्याने साथीदार विशाल जाधव व किशोर पवार यांचे मदतीने केले असल्याचे सांगितले.
आरोपी नदीम शेख याच्याकडे कार चोरीबाबत चौकशी केली असता पंजाब राज्यातील जुना बाजार मार्केट मधून इलेक्ट्रानिक मशीन व कारच्या डुप्लीकेट चावी प्राप्त करून घेत होता. चावीचे मॉडेल हे ज्या वर्षातील आहे, त्याप्रमाणे कारचे मॉडेल चेक केले जाते. त्यासाठी काचेवर नमुद असलेले मॉडेलचे वर्ष पाहून कारचे ड्रायव्हर बाजूचे काचेतून तार किंवा पट्टी टाकून दरवाजा उघडायचे. त्यानंतर इलेक्ट्रानिक मशीन व कारच्या डुप्लीकेट चावी प्राप्त करून घेत असे.
दरम्यान, चावीचे मॉडेल हे ज्या वर्षातील आहे, त्याप्रमाणे कारचे मॉडेल चेक केले जाते. त्यासाठी काचेवर नमुद असलेले मॉडेलचे वर्ष पाहून कारचे ड्रायव्हर बाजूचे काचेतून तार किंवा पट्टी टाकून दरवाजा उघडला जात होता. कार पुढे तामिळनाडू, कर्नाटक राज्यात पाठविली जाते किंवा कारचे स्पेअर पार्ट करून विक्री केली जाते असे सांगितले. आरोपी नदीम शेख याचेवर अहमदनगर, पुणे ग्रामीण, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, बुलढाणा या जिल्हयात चारचाकी वाहन चोरीचे १९ गुन्हे दाखल आहेत. सदर आरोपीकडून मागील वर्षात स्थानिक गुन्हे शाखेने ४ चारचाकी वाहने तामिळनाडू राज्यातून हस्तगत केल्या होत्या.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, शिरूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक एकनाथ पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार तुषार पंदारे, जनार्धन शेळके, संजु जाधव, राजु मोमीण, अतुल डेरे, मंगेश थिगळे, सागर धुमाळशिरूर पोलीस ठाण्यातील अंमलदार नाथासाहेब जगताप, विजय शिंदे, नितेश थोरात, योगेश गुंड, यांनी केली आहे.