Friday, June 19, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

शिरूरमध्ये एटीएसचा छापा! एमडी ड्रग्जसह 2 जण ताब्यात, 1 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Wednesday, 8 April 2026, 22:58

शिरूर: पुणे जिल्ह्यातील शिरूर परिसरात दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) मोठी कारवाई करत मॅफेड्रॉन (एमडी) या अमली पदार्थाची विक्री करणाऱ्या 2 तरुणांना ताब्यात घेतले आहे. या कारवाईत सुमारे 1,04,000 रुपये किमतीचा ड्रग्ज साठा जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई 7 मार्च रोजी करण्यात आली.

रांजणगाव एमआयडीसी आणि शिरूर परिसरात एमडीसारख्या घातक ड्रग्जमुळे अनेक तरुण व्यसनाधीन होत असल्याची माहिती समोर आल्यानंतर पोलिसांनी याची गंभीर दखल घेतली. पुणे जिल्हा पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल यांच्या आदेशानुसार एटीएस पथकाने गुप्त माहितीच्या आधारे तपास सुरू केला.

तपासादरम्यान शिरूर हद्दीत पुणे-अहिल्यानगर महामार्गाजवळील ‘एम्पायर’ नावाच्या पान टपरीवर एक तरुण एमडी ड्रग्ज विकत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार एटीएस पथकाने शिरूर पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांसह साध्या वेशात छापा टाकला.

 

या कारवाईत साहील संदीप करंजुले (वय 20, रा. पाडळी, रांजणगाव, ता. पारनेर, जि. अहिल्यानगर) आणि ओंकार संजय धावडे (वय 23, रा. रामलिंग रोड, शिरूर, जि. पुणे) यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्या ताब्यातून विक्रीसाठी ठेवलेला एमडी ड्रग्ज साठा जप्त करण्यात आला.

या प्रकरणी शिरूर पोलीस स्टेशनमध्ये अमली पदार्थ कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना पुढील कारवाईसाठी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. न्यायालयात हजर केले असता त्यांना 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

ही कारवाई पुणे जिल्हा पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले, शिरूर पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

या पथकात सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश पवार, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक महेश गायकवाड, विशाल गव्हाणे, पोलीस हवालदार निलेश कदम, रवींद्र जाधव, मोसीन शेख, ओंकार शिंदे, जालिंदर मुळीक तसेच शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक हनुमंत नकाते, पोलीस हवालदार नितीन सुद्रीक, राहुल भवर आणि पवन तायडे यांचा समावेश होता.

आरोपींकडील अमली पदार्थ कुठून आणले गेले आणि यामागे कोणते मोठे रॅकेट आहे याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक हनुमंत नकाते करत आहेत.

 

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

हडपसर – यवत व पुणे शिरूर उन्नत मार्गाबाबत महत्त्वपूर्ण बैठक संपन्न; काम सुरु होण्यापूर्वीच वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आमदार राहुल कुल प्रयत्नशील

Friday, 19 June 2026, 19:04

दोघंही आयटी इंजिनिअर, कामानिमित्त भेटले, प्रेम जुळलं लग्न केलं अन् नंतर असं काही घडलं की विवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल…

Friday, 19 June 2026, 18:57

‘तुझी बायको मला, माझी तुला!’ फेसबूकवरून चालते पार्टनर स्वॅपिंगचे गलिच्छ रॅकेट; एका रात्रीचे मिळतात 20 हजार

Friday, 19 June 2026, 18:14

वरवंड येथील “हॉटेल सिद्धेश्वर प्युअर व्हेज” मधून वीजचोरी; दोघांवर गुन्हा दाखल 

Friday, 19 June 2026, 18:09

हिंजवडी मेट्रो सज्ज! 6 ते 8 मिनिटांच्या अंतराने धावणार ट्रेन; तिकीट आता तुमच्या व्हॉट्सॲपवर

Friday, 19 June 2026, 18:06

सकाळी उठल्या उठल्या डोकं दुखतंय? असू शकतो शुगर कमी होण्याचा धोका; वेळीच व्हा सावध

Friday, 19 June 2026, 17:15
Next Post

युद्धविरामाचा 24 तासांतच फज्जा! इस्रायलचा लेबनॉनवर भीषण हवाई हल्ला; 50 फायटर जेट्स, 160 बॉम्ब अन् 100 हून अधिक ठार

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.