Sunday, October 11, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

उरुळी कांचन येथील महात्मा गांधी विद्यालयाच्या खेळाडूंचा क्रीडाक्षेत्रात डंका; बॉक्सिंगमध्ये दोन सुवर्णपदके; सेपक टकरा, मैदानी स्पर्धा आणि कबड्डीतही घवघवीत यश

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Saturday, 10 October 2026, 12:06

उरुळी कांचन (पुणे) : उरुळी कांचन येथील महात्मा गांधी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी विविध शालेय क्रीडा स्पर्धांमध्ये घवघवीत यश संपादन केले. बॉक्सिंगमध्ये दोन सुवर्णपदके व एक कांस्यपदक, सेपक टकरा स्पर्धेत प्रथम व द्वितीय क्रमांक, तर कबड्डीत उपविजेतेपद पटकावत विद्यार्थ्यांनी विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. विशेष म्हणजे, अनेक खेळाडूंची पुढील स्तरावरील स्पर्धांसाठी निवड झाली असून, विभागीय बॉक्सिंग स्पर्धेत यशवर्धन कांचन याने कांस्यपदक मिळवून विद्यालयाच्या यशात आणखी भर घातली आहे. अशी माहिती विद्यालयाच्या प्राचार्या संगीता शिर्के यांनी दिली.

लोणी काळभोर येथील एमआयटी विश्वशांती गुरुकुल येथे झालेल्या जिल्हास्तरीय बॉक्सिंग स्पर्धेत विद्यालयाच्या खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी केली. यामध्ये कु. हरमनप्रीत कौर हिने 17 वर्षे वयोगटातील 42 किलोखालील गटात, तर यशवर्धन कांचन याने 17 वर्षे वयोगटातील 52 किलो गटात प्रथम क्रमांक मिळवत सुवर्णपदक पटकावले. लोकेश जगदाळे याने 14 वर्षे वयोगटातील स्पर्धेत कांस्यपदक मिळविले. या यशस्वी कामगिरीच्या जोरावर हरमनप्रीत कौर व यशवर्धन कांचन यांची विभागीय बॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड झाली. पुढे विभागीय स्तरावरील स्पर्धेत यशवर्धन कांचन याने कांस्यपदक पटकावत आपली गुणवत्ता सिद्ध केली.

टी. सी. कॉलेज, बारामती येथे आयोजित जिल्हास्तरीय सेपक टकरा स्पर्धेतही विद्यालयाच्या खेळाडूंनी शानदार कामगिरी केली. 17 वर्षे वयोगटातील मुलांच्या संघाने प्रथम क्रमांक पटकावून विभागीय स्पर्धेत प्रवेश निश्चित केला. तसेच 14 वर्षे आणि 19 वर्षे वयोगटातील मुलांच्या संघांनी द्वितीय क्रमांक मिळवत विद्यालयाच्या यशात भर घातली.

शिवछत्रपती क्रीडानगरी, बालेवाडी येथे झालेल्या हवेली तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत विद्यालयाच्या खेळाडूंनी आपली क्षमता सिद्ध केली. 17 वर्षे वयोगटातील पाच किलोमीटर चालण्याच्या स्पर्धेत अभिजीत मच्छिंद्र भागवत याने प्रथम, तर स्वराज राजेंद्र कांचन याने द्वितीय क्रमांक पटकावला. थाळीफेक स्पर्धेत हर्षवर्धन सोमनाथ डंबरे याने द्वितीय क्रमांक मिळविला. या तिन्ही खेळाडूंची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. याशिवाय, 17 वर्षे वयोगटातील मुलांच्या 4 × 400 मीटर रिले संघाने तृतीय क्रमांक मिळवला. तालुकास्तरीय शालेय कबड्डी स्पर्धेत खेळाडूंनी जिद्द, चपळाई आणि संघभावनेच्या जोरावर द्वितीय क्रमांक मिळवत उपविजेतेपद पटकावले.

 

दरम्यान, विद्यार्थ्यांच्या या यशामागे शारीरिक शिक्षण शिक्षक कुंभारकर सर, विमल कांचन, माने सर, विक्रांत पंडित सर आणि तानाजी मेंढे सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे उपाध्यक्ष, सचिव, सर्व विश्वस्त व पदाधिकारी, विद्यालयाच्या प्राचार्या संगीता शिर्के, प्रशासकीय वर्ग, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी सर्व यशस्वी खेळाडू व मार्गदर्शकांचे अभिनंदन केले. तसेच आगामी स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

पैशांच्या पेट्या उघडताच त्यात निघाल्या दगड, विटा अन् रद्दी पेपर; पुण्यात शिक्षण संस्थाचालकाची ‘फिल्मी स्टाईल’ फसवणूक

Sunday, 11 October 2026, 14:34

केएसबी चौकातील उड्डाणपुलावर ट्रॅक्टर-दुचाकीचा भीषण अपघात; 8 वर्षांच्या चिमुरडीचा जागीच मृत्यू!

Sunday, 11 October 2026, 13:52

पुण्यात गुंडगिरीचा थरार! पोलिसांत तक्रार द्यायला निघालेल्या तरुणाला रस्त्यात गाठलं, कोयत्याने सपासप वार…

Sunday, 11 October 2026, 13:33

थाटामाटात लग्न, तिसऱ्याच दिवशी नववधूचा भयंकर डाव!अख्ख्या सासरच्या कुटुंबालाच विष पाजलं?

Sunday, 11 October 2026, 12:29

नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या दरात मोठा बदल! 22 अन् 24 कॅरेटचे आजचे भाव जाणून घ्या …..

Sunday, 11 October 2026, 12:12

धावत्या ॲम्ब्युलन्समध्ये नेमकं काय घडलं? रुग्ण थेट रस्त्यावर फेकला गेला; पिंपरी-चिंचवडमधील रुग्णवाहिका चालकाचा बेजबाबदारपणा

Sunday, 11 October 2026, 11:36
Next Post

दुष्काळी परिस्थितीतही शेतकऱ्यांना लुटणाऱ्या सावकारांना सहकार विभागाचा दणका! 204 अधिकाऱ्यांचे 28 ठिकाणी छापे; अकोल्यात खळबळ

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp