पुणे : नवरात्रीच्या उत्सवाला आजपासून उत्साहात सुरुवात झाली असून, या शुभ प्रसंगी अनेक जण सोने-चांदी खरेदी करण्याला प्राधान्य देतात. गेल्या काही दिवसांत मौल्यवान धातूंच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे.गेल्या काही दिवसांत 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅम दरात तब्बल 2240 रुपयांची, तर 22 कॅरेट सोन्याच्या दरात 2050रुपयांची वाढ नोंदवली गेली आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील घडामोडी, अमेरिकन डॉलरमधील बदल आणि जागतिक आर्थिक स्थितीचा थेट परिणाम सोन्या-चांदीच्या किमतींवर होत असतो.आज 22 ऑक्टोबर रोजी देशातील प्रमुख शहरांमधील सोन्याचे प्रति 10 ग्रॅम दर खालीलप्रमाणे आहेत:

मुंबई: 24 कॅरेट सोने 1,51,420रुपये आणि 22 कॅरेट सोने 1,38,800 रुपये.

दिल्ली: 24 कॅरेट सोने 1,51,570 रुपये आणि 22 कॅरेट सोने 1,38,950 रुपये.
कोलकाता: 24 कॅरेट सोने 1,51,420पये आणि 22 कॅरेट सोने 1,38,800रुपये.
दुसरीकडे, चांदीच्या बाजारातही मोठे बदल झाले आहेत. महिन्याच्या सुरुवातीला म्हणजेच 1 ऑक्टोबर रोजी चांदीच्या प्रतिकिलो दरात 5000 रुपयांची घसरण झाली होती. त्यानंतर काही दिवस दर स्थिर राहिल्यानंतर 10 ऑक्टोबर रोजी पुन्हा 5000रुपयांची वाढ झाली. आज 11 ऑक्टोबर रोजी मुंबई, दिल्ली आणि कोलकाता या प्रमुख शहरांमध्ये चांदीचा दर प्रति किलो 2,40,000रुपये इतका आहे, तर चेन्नईमध्ये चांदीचा भाव 2,45,000 प्रति किलो नोंदवला गेला आहे.
सोन्याचे वाढलेले दर आणि सणासुदीचा काळ यामुळे ग्राहकांचे लक्ष आता आगामी दिवसांमधील दर बदलांकडे लागले आहे. तुम्ही जर खरेदीचा बेत आखत असाल, तर बाजारातील ताज्या घडामोडींवर लक्ष ठेवून निर्णय घेणे फायदेशीर ठरणार आहे.







