Monday, October 12, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

केएसबी चौकातील उड्डाणपुलावर ट्रॅक्टर-दुचाकीचा भीषण अपघात; 8 वर्षांच्या चिमुरडीचा जागीच मृत्यू!

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Sunday, 11 October 2026, 13:52

पुणे : पुण्यात एक अत्यंत दुर्दैवी आणि मन हेलावून टाकणारी दुर्घटना घडली आहे. पिंपरी-चिंचवडमधील केएसबी चौकातील उड्डाणपुलावर ट्रॅक्टर आणि दुचाकीच्या भीषण अपघातात एका आठ वर्षांच्या चिमुरडीचा जागीच मृत्यू झाला आहे. या अपघातात तिच्या आई-वडिलांना गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

प्राप्त माहितीनुसार, फरान मोमीन (वय 32) हे आपल्या कुटुंबासह दुचाकीवरून जात होते. त्यांच्यासोबत त्यांची पत्नी मारिना फरान मोमीन आणि आठ वर्षांची मुलगी हातिन फरान मोमीन हे देखील होते. दरम्यान, केएसबी चौक पुलावर त्यांच्या दुचाकीला एका ट्रॅक्टरने जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, दुचाकीवरील सर्वजण रस्त्यावर फेकले गेले.

या अपघातात चिमुरडी हातिन मोमीन हिचा जागीच मृत्यू झाला. मयत मुलीचा मृतदेह पुढील तपासणीसाठी आणि विच्छेदनासाठी वायसीएम रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. दुसरीकडे, गंभीर जखमी झालेल फरान मोमीन आणि त्यांची पत्नी मारिना मोमीन यांना तातडीने उपचारासाठी येथील धनश्री हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर सध्या वैद्यकीय उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.

अपघातानंतर घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून वाहतूक सुरळीत केली. तसेच, अपघातानंतर घटनास्थळावरून फरार झालेल्या ट्रॅक्टर चालकाचा शोध पोलीस कसून घेत आहेत. चालकाला लवकरच ताब्यात घेण्यात येईल आणि त्याच्याविरुद्ध योग्य तो कायदेशीर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.

 
Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

गरबा खेळायचा असेल तर सनातन धर्म मान्य करा, कपाळावर गोमूत्राचा टिळा लावा; अटींमुळे नवा वाद

Monday, 12 October 2026, 16:15

SIR बद्दल महत्वाची अपडेट! मतदार यादीच्या अंतिम प्रसिद्धीची तारीख पुढे ढकलली; भारत निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय

Monday, 12 October 2026, 16:07

“तिने आत्महत्या केली, माझं धाडस झालं नाही…” प्रियकराचा दावा; पोलिसांना मात्र चॅट हिस्ट्रीतून वेगळाच संशय; तरन्नुम प्रकरणाला नवं वळण

Monday, 12 October 2026, 16:01

राजगडावर ट्रेकिंग करतांना मालकाचा मृत्यू पण लाडक्या श्वानाने असं काही केलं की.., धक्का देऊन उठवण्याचा प्रयत्न; काळीज पिळवटून टाकणारी घटना

Monday, 12 October 2026, 15:59

लाडक्या बहिणींना १५०० रुपयांऐवजी थेट २,१०० रुपयांचा हप्ता मिळणार? प्रशासनाकडून मोठी अपडेट समोर; जाणून घ्या संपूर्ण माहिती

Monday, 12 October 2026, 15:41

दौंडमध्ये भररस्त्यात २ महिलांना लाकडी दांडक्याने मारहाण! छेडछाड अन् अंगावरील कपडे फाडल्याचा आरोप; ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Monday, 12 October 2026, 15:18
Next Post

पैशांच्या पेट्या उघडताच त्यात निघाल्या दगड, विटा अन् रद्दी पेपर; पुण्यात शिक्षण संस्थाचालकाची 'फिल्मी स्टाईल' फसवणूक

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp