Sunday, October 11, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पैशांच्या पेट्या उघडताच त्यात निघाल्या दगड, विटा अन् रद्दी पेपर; पुण्यात शिक्षण संस्थाचालकाची ‘फिल्मी स्टाईल’ फसवणूक

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Sunday, 11 October 2026, 14:34

पुणे: पुण्यात कोट्यवधी रुपयांचे कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवून एका शिक्षण संस्थाचालकाची ८७ लाख ६१ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. कर्जाचे धनादेश बँकेत वटले नसल्याने पैसे परत मागितल्यानंतर आरोपींनी सहा बॅगा आणि दोन पेट्या दिल्या. त्यामध्ये पैसे असल्याचे सांगितले. मात्र, या बॅगा आणि पेट्या उघडल्यानंतर त्यात रोकड नसून विटा, जुनी वर्तमानपत्रे, चादरी आणि उशा असल्याचे समोर आले. या प्रकरणी पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

अनुप दिवेकर (वय ४२), आनंद दिवेकर (वय ४४, दोघे रा. निगडी प्राधिकरण) आणि देशमुख नावाच्या एका व्यक्तीविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. ‘जाधव ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट’चे संस्थापक सुधाकरराव उद्धवराव जाधव (वय ६५, रा. नऱ्हे) यांनी याबाबत तक्रार दिली आहे. २५ डिसेंबर २०२३ ते जून २०२६ या काळात हा प्रकार घडल्याचे तक्रारीत नमूद आहे.

जाधव यांना आपल्या शिक्षण संस्थेच्या विस्तारासाठी मोठ्या कर्जाची आवश्यकता होती. ही बाब लक्षात घेऊन आरोपींनी कर्जाच्या एकूण रकमेच्या दहा टक्के रक्कम आगाऊ भरावी लागेल, असे सांगितल्याचा आरोप आहे. त्यांच्यावर विश्वास ठेवून जाधव, त्यांच्या पत्नी आणि संस्थेतील कर्मचाऱ्यांनी रोख तसेच ऑनलाइन पद्धतीने एकूण ८७ लाख ६१ हजार रुपये आरोपींच्या वैयक्तिक बँक खात्यांवर आणि ‘आदेश एंटरप्रायजेस’च्या खात्यावर जमा केले.

विश्वास संपादन करण्यासाठी आरोपींनी ५० कोटी, २५ कोटी, १० कोटी आणि ५ कोटी रुपयांचे धनादेश दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे. मात्र, हे धनादेश बँकेत वटले नाहीत. कर्ज मंजूर झाल्याची बनावट पत्रे दाखवून विविध कार्यालयांत नेऊन दिशाभूल केल्याचाही आरोप आहे.

 

पैसे परत मागितल्यानंतर आरोपींनी रोकड असल्याचे सांगून सहा बॅगा आणि दोन पेट्या दिल्या. मात्र, त्यात विटा, रद्दी, चादरी आणि उशा आढळल्या. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर जाधव यांनी पोलिसांकडे धाव घेतली. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

‘मी तुला आयफोन दिला, आता माझ्याशी लग्न कर” बॉयफ्रेंडनं महागडा फोन देऊन जाळ्यात ओढलं नंतर लग्नाचा दबाव; तरुणीनं उचललं टोकाचं पाऊल

Sunday, 11 October 2026, 15:14

लहानपणी हरवली अन् २४ वर्षानंतर सापडली! हातावरचा टॅटू अन् मतदार यादीमुळे घडला चमत्कार; २४ वर्षांनी भावाला बघून डोळे पाणावले…

Sunday, 11 October 2026, 14:55

महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट! शेतकऱ्यांचे हाल, पाहणीनंतर देवेंद्र फडणवीसांचा मोठा निर्णय; म्हणाले ” आम्ही सर्व मदत…

Sunday, 11 October 2026, 14:52

पुण्यातील MPSC आंदोलनावरून रोहित पवार आक्रमक !सरकारला आज संध्याकाळपर्यंतची डेडलाईन; म्हणाले, ‘निर्णय घ्या, नाहीतर…’

Sunday, 11 October 2026, 14:47

रात्रीच्या अंधारात मुलींना दुसऱ्या खोलीत न्यायचा! जन्मदात्या बापाचा किळसवाणा प्रकार; दोन्ही मुलींच्या शरीराचे तोडले लचके, आईला जाग येताच जे दिसलं ते…

Sunday, 11 October 2026, 14:43

पैशांच्या पेट्या उघडताच त्यात निघाल्या दगड, विटा अन् रद्दी पेपर; पुण्यात शिक्षण संस्थाचालकाची ‘फिल्मी स्टाईल’ फसवणूक

Sunday, 11 October 2026, 14:34
Next Post

रात्रीच्या अंधारात मुलींना दुसऱ्या खोलीत न्यायचा! जन्मदात्या बापाचा किळसवाणा प्रकार; दोन्ही मुलींच्या शरीराचे तोडले लचके, आईला जाग येताच जे दिसलं ते...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp