Monday, October 12, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

लहानपणी हरवली अन् २४ वर्षानंतर सापडली! हातावरचा टॅटू अन् मतदार यादीमुळे घडला चमत्कार; २४ वर्षांनी भावाला बघून डोळे पाणावले…

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Sunday, 11 October 2026, 14:55

मुंबई: लहानपणी कुटुंबापासून दुरावलेली बहीण तब्बल २४ वर्षांनंतर पुन्हा आपल्या भावंडांना भेटली. ठाणे पोलिसांच्या बाल संरक्षण कक्षाने जुन्या मतदार यादीतील नोंदींच्या मदतीने अवघ्या सहा तासांत तिच्या कुटुंबाचा शोध घेतला. व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून झालेल्या या पुनर्भेटीवेळी भावंडांना अश्रू अनावर झाले. अनेक वर्षांपासून मनात असलेली कुटुंबाला भेटण्याची इच्छा अखेर पूर्ण झाल्याने या घटनेची चर्चा होत आहे.

भारती अश्रू कदम या २००२ मध्ये लहान असताना कुटुंबासोबत मुंबईत मामाकडे आल्या होत्या. यावेळी कुटुंबापासून त्यांची ताटातूट झाली. त्यानंतर त्या नवी मुंबईतील बेलापूर पोलिसांना आढळल्या. मात्र, त्यांच्या कुटुंबीयांचा शोध लागला नसल्याने त्यांना बालगृहात ठेवण्यात आले. पुढे त्यांचा विवाह झाला आणि त्यांचे नाव जान्हवी वैभव झांबरे असे झाले. सध्या त्या सोलापूर येथे पती आणि दोन मुलांसह राहतात.

बालपणी कुटुंबापासून दूर झाल्याची खंत त्यांच्या मनात कायम होती. त्यामुळे गेल्या आठ वर्षांपासून त्या आपल्या नातेवाइकांचा शोध घेत होत्या. दुसरीकडे, त्यांचे भाऊ विजय अश्रू कदम यांनीही हरवलेल्या बहिणीचा शोध सुरू ठेवला होता.

८ ऑक्टोबर रोजी भारती यांनी ठाणे शहर पोलिसांच्या बाल संरक्षण कक्षाशी संपर्क साधून कुटुंबीयांना शोधून देण्याची विनंती केली. पोलिसांनी जुन्या अभिलेखांची तपासणी करून नवी मुंबई पोलिसांशी संपर्क साधला. भारती यांच्या हातावर गोंदवलेले ‘भारती अश्रू कदम’ हे नाव महत्त्वाचा पुरावा ठरले. त्यानंतर २००२ मधील मतदार यादी आणि इतर जुन्या नोंदी तपासण्यात आल्या. मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांच्या मदतीने त्यांच्या कुटुंबीयांचा ठावठिकाणा मिळवण्यात आला.

 

त्यानंतर भारती यांचे भाऊ प्रकाश आणि विजय तसेच बहीण शालिनी यांच्याशी संपर्क साधण्यात आला. पोलिसांनी व्हिडिओ कॉलद्वारे भारती यांची भावंडांशी भेट घडवून आणली. तब्बल २४ वर्षांनंतर बहिणीला पाहून कुटुंबीय भावूक झाले. जुन्या नोंदी आणि पोलिसांच्या प्रयत्नांमुळे दुरावलेल्या कुटुंबाची पुन्हा भेट घडून आली.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

आत्महत्येच्या आदल्या रात्री पट्ट्याने मारहाण! चारित्र्यावर संशय अन् खाकी घालून जनतेचं रक्षण करणाऱ्या महिलेचा दुर्दैवी अंत, स्मिता माने प्रकरणात नवा खुलासा

Monday, 12 October 2026, 17:21

कदमवाकवस्ती येथे जलजीवन मिशनच्या पाइपांना आग; लाखोंचे नुकसान, अग्निशामक दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला!

Monday, 12 October 2026, 17:06

पुणेकरांनो धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त दीक्षाभूमीला जाताय? १९ आणि २१ ऑक्टोबरला सुटणार विशेष रेल्वेगाड्या; वाचा वेळापत्रक

Monday, 12 October 2026, 17:03

गरबा खेळायचा असेल तर सनातन धर्म मान्य करा, कपाळावर गोमूत्राचा टिळा लावा; अटींमुळे नवा वाद

Monday, 12 October 2026, 16:15

SIR बद्दल महत्वाची अपडेट! मतदार यादीच्या अंतिम प्रसिद्धीची तारीख पुढे ढकलली; भारत निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय

Monday, 12 October 2026, 16:07

“तिने आत्महत्या केली, माझं धाडस झालं नाही…” प्रियकराचा दावा; पोलिसांना मात्र चॅट हिस्ट्रीतून वेगळाच संशय; तरन्नुम प्रकरणाला नवं वळण

Monday, 12 October 2026, 16:01
Next Post

'मी तुला आयफोन दिला, आता माझ्याशी लग्न कर" बॉयफ्रेंडनं महागडा फोन देऊन जाळ्यात ओढलं नंतर लग्नाचा दबाव; तरुणीनं उचललं टोकाचं पाऊल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp