Tuesday, November 17, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुणेकरांनो धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त दीक्षाभूमीला जाताय? १९ आणि २१ ऑक्टोबरला सुटणार विशेष रेल्वेगाड्या; वाचा वेळापत्रक

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Monday, 12 October 2026, 17:03

पुणे : धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त नागपूर येथील दीक्षाभूमीवर जाणाऱ्या अनुयायांची मोठी गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पुणे ते नागपूर दरम्यान दोन अनारक्षित विशेष रेल्वेगाड्या चालवण्यात येणार आहेत. ‘ट्रेन ऑन डिमांड’ (TOD) योजनेअंतर्गत या गाड्या धावणार असून, प्रवाशांना आगाऊ आरक्षण न करता सामान्य तिकीट काढून प्रवास करता येणार आहे. त्यामुळे ऐन सणाच्या काळात पुणे-नागपूर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

गाडी क्रमांक ०१२१५ पुणे-नागपूर विशेष रेल्वे १९ आणि २१ ऑक्टोबर रोजी पुणे स्थानकातून दुपारी २ वाजून ५० मिनिटांनी सुटेल. ही गाडी दुसऱ्या दिवशी सकाळी ७ वाजून ३० मिनिटांनी नागपूरला पोहोचणार आहे.

परतीच्या प्रवासासाठी गाडी क्रमांक ०१२१६ नागपूर-पुणे विशेष रेल्वे २० आणि २२ ऑक्टोबर रोजी नागपूर स्थानकातून रात्री ११ वाजता सुटेल. दुसऱ्या दिवशी दुपारी ४ वाजून २० मिनिटांनी ही गाडी पुण्यात पोहोचेल.

प्रवाशांच्या सोयीसाठी या विशेष गाड्यांना दौंड कॉर्ड लाइन, अहिल्यानगर, बेलापूर, कोपरगाव, मनमाड, जळगाव, भुसावळ, अकोला, बडनेरा, वर्धा आणि अजनी या स्थानकांवर थांबे देण्यात आले आहेत.

प्रत्येक गाडीला एकूण १८ डबे असतील. त्यापैकी १६ डबे अनारक्षित सामान्य श्रेणीचे, तर दोन डबे गार्ड-लगेज व्हॅन असतील. त्यामुळे प्रवाशांना आरक्षणाची चिंता न करता सामान्य तिकीट घेऊन प्रवास करता येईल.

प्रवाशांना रेल्वे स्थानकावरील तिकीट खिडकीवरून किंवा यूटीएस मोबाईल अ‍ॅपद्वारे तिकीट खरेदी करता येणार आहे. प्रवासाला निघण्यापूर्वी गाड्यांचे वेळापत्रक आणि उपलब्ध माहिती अधिकृत एनटीईएस अ‍ॅपवर तपासून घ्यावी, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.

धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त नागपूरला जाणाऱ्या अनुयायांची गर्दी लक्षात घेता या विशेष गाड्यांमुळे प्रवाशांना अतिरिक्त रेल्वेसेवेचा पर्याय उपलब्ध होणार आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार १८ हजारांवरून थेट ६९ हजार होणार? ८व्या वेतन आयोगाबाबत महत्वाची अपडेट; वाचा सविस्तर…

Tuesday, 17 November 2026, 18:53

शिवसेना कोणाची? सुनावणी अंतिम टप्प्यात; शिंदे गटाचा सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तिवाद, नेमकं काय घडलं…

Tuesday, 17 November 2026, 18:51

“अमित शहांनी अजित पवारांचं जगणं मुश्किल केलं होत” उद्धव ठाकरेंचा गंभीर आरोप; नेमकं काय म्हणाले?

Tuesday, 17 November 2026, 18:43

अक्कलकोटमध्ये FDA ची मोठी कारवाई; स्वामी समर्थ मंदिर परिसरातून ८५० किलो मिठाई जप्त, अनेक दुकाने बंद!

Tuesday, 17 November 2026, 18:39

भोरमध्ये जमिनीच्या हक्कसोडपत्राच्या वादातून पोलीस पाटलांचा कोयत्याने वार करून निर्घृण खून! आरोपींच्या अटकेसाठी ग्रामस्थांचा राजगड पोलीस ठाण्यासमोर ठिय्या

Tuesday, 17 November 2026, 18:12

मूलभूत सुविधा नाहीत, मग वाढीव मिळकतकर कशासाठी? ३२ गावांच्या करप्रश्नी माऊली आबा कटके आक्रमक

Tuesday, 17 November 2026, 17:58
Next Post

कदमवाकवस्ती येथे जलजीवन मिशनच्या पाइपांना आग; लाखोंचे नुकसान, अग्निशामक दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp