Sunday, October 11, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

‘मी तुला आयफोन दिला, आता माझ्याशी लग्न कर” बॉयफ्रेंडनं महागडा फोन देऊन जाळ्यात ओढलं नंतर लग्नाचा दबाव; तरुणीनं उचललं टोकाचं पाऊल

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Sunday, 11 October 2026, 15:14

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यात एका तरुणीला लग्नासाठी दबाव टाकून ब्लॅकमेल केल्याच्या आरोपावरून तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीने तरुणीला आयफोन भेट दिला होता. त्यानंतर लग्नासाठी सतत दबाव टाकत बदनामी करण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे. या मानसिक त्रासाला कंटाळून तरुणीने आत्महत्या केल्याची तक्रार तिच्या वडिलांनी पोलिसांकडे केली आहे. ही घटना १४ मे २०२६ रोजी जोगेश्वरी येथील गणेशनगर परिसरात घडली.

गणेश शंकर शेंडगे (रा. जोगेश्वरी, ता. गंगापूर, मूळ रा. बरडा, ता. सेनगाव, जि. हिंगोली) असे आरोपीचे नाव आहे. तर हनवंता शेषराव सिरामे (वय ४२, रा. गणेशनगर, जोगेश्वरी) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे.

फिर्यादीनुसार, आरोपीने तरुणीला काळ्या रंगाचा आयफोन घेऊन दिला होता. त्यानंतर तो तिच्यावर लग्न करण्यासाठी दबाव टाकत होता. “माझ्यासोबत लग्न कर, अन्यथा तुझी बदनामी करेन आणि तुला कुठेही लग्न करू देणार नाही,” अशा धमक्या दिल्याचा आरोप वडिलांनी केला आहे. आरोपीकडून सातत्याने मानसिक त्रास दिला जात असल्याचेही तक्रारीत नमूद आहे.

१४ मे रोजी हनवंता सिरामे आणि त्यांची पत्नी कामावरून घरी परतले असता घराची कडी बाहेरून लावलेली आढळली. घरात प्रवेश केल्यानंतर त्यांची मुलगी गंभीर अवस्थेत आढळली. कुटुंबीयांनी तिला तातडीने घाटी रुग्णालयात दाखल केले; मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर तिला मृत घोषित केले.

 

मुलीच्या मृत्यूनंतर तिच्या मोबाईलची आणि इतर बाबींची चौकशी केली असता आयफोन आरोपी गणेश शेंडगे याने दिल्याची माहिती समोर आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. आरोपीच्या धमक्या आणि मानसिक त्रासामुळेच मुलीने टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप तिच्या वडिलांनी केला आहे.

या तक्रारीवरून एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम १०८ आणि ३५१(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक सुरेश सांगळे या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

नाना पाटेकरांच्या मृत्यूचं धक्कादायक कारण समोर! पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये गंभीर आजाराचा खुलासा; नेमकं काय घडलं?

Sunday, 11 October 2026, 15:24

‘मी तुला आयफोन दिला, आता माझ्याशी लग्न कर” बॉयफ्रेंडनं महागडा फोन देऊन जाळ्यात ओढलं नंतर लग्नाचा दबाव; तरुणीनं उचललं टोकाचं पाऊल

Sunday, 11 October 2026, 15:14

लहानपणी हरवली अन् २४ वर्षानंतर सापडली! हातावरचा टॅटू अन् मतदार यादीमुळे घडला चमत्कार; २४ वर्षांनी भावाला बघून डोळे पाणावले…

Sunday, 11 October 2026, 14:55

महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट! शेतकऱ्यांचे हाल, पाहणीनंतर देवेंद्र फडणवीसांचा मोठा निर्णय; म्हणाले ” आम्ही सर्व मदत…

Sunday, 11 October 2026, 14:52

पुण्यातील MPSC आंदोलनावरून रोहित पवार आक्रमक !सरकारला आज संध्याकाळपर्यंतची डेडलाईन; म्हणाले, ‘निर्णय घ्या, नाहीतर…’

Sunday, 11 October 2026, 14:47

रात्रीच्या अंधारात मुलींना दुसऱ्या खोलीत न्यायचा! जन्मदात्या बापाचा किळसवाणा प्रकार; दोन्ही मुलींच्या शरीराचे तोडले लचके, आईला जाग येताच जे दिसलं ते…

Sunday, 11 October 2026, 14:43
Next Post

नाना पाटेकरांच्या मृत्यूचं धक्कादायक कारण समोर! पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये गंभीर आजाराचा खुलासा; नेमकं काय घडलं?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp