उरुळी कांचन : महिलांना आर्थिक, सामाजिक आणि राजकीयदृष्ट्या स्वतंत्र बनवणे आणि त्यांना समाजात अर्थसंपन्न आणि यशस्वी होण्याची सर्व संधी उपलब्ध करण्याच्या उद्देशाने ‘आरी वर्क’ हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. अशी माहिती सोरतापवाडीच्या सरपंच स्नेहल चौधरी यांनी दिली.
सोरतापवाडी (ता. हवेली) ग्रामपंचायत कार्यालयात 15 वा वित्त आयोग व ग्रामनिधीमधून महिलांसाठी शुक्रवारी (ता. 06) आरी वर्कचे प्रशिक्षणाचे आयोजन शुक्रवार (ता. 06) पासुन करण्यात आले आहे. या प्रशिक्षणाची माहिती देताना सरपंच चौधरी बोलत होत्या.
यावेळी उपसरपंच विजय चौधरी, सदस्य अश्विनी शेलार, मनीषा चौधरी, सोनाली लोंढे, ग्रामविकास अधिकारी संतोष गायकवाड, आदी महिला व ग्रामपंचायतीचे कर्मचारी उपस्थित होते. दरम्यान, पुढील 20 दिवस हे प्रशिक्षण सुरु राहणार आहे. सदरचे प्रशिक्षण हे ग्रामपंचायत कार्यालयात देण्यात येत असून परिसरातील महिलांनी याचा लाभ घ्यावा. असे आवाहन सरपंच स्नेहल चौधरी यांनी य्वेली केले आहे.