Loni Kalbhor -लोणी काळभोर, (पुणे) : लोणी काळभोर (ता. हवेली) (Loni Kalbhor) येथील ग्रामदैवत श्रीमंत अंबरनाथाच्या (Shrimant Ambernath ) वार्षिक उत्सवानिमित्त (annual festival) गुढीपाडव्या पासून विविध धार्मिक कार्यक्रमांना (religious programs ) मोठ्या उत्साहात सुरवात (begin with a grand celebration) झाली आहे. आगामी पंधरा दिवसांच्या कालावधीत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहेत. (Loni Kalbhor)
ग्रामदैवत श्रीमंत अंबरनाथाची वार्षिक यात्रा चैत्र पोर्णिमेला
ग्रामदैवत श्रीमंत अंबरनाथाची वार्षिक यात्रा चैत्र पोर्णिमेला (हनुमान जयंती ) असते. यंदा ही यात्रा गुरुवारी (ता. ०६ एप्रिल व शुक्रवार ता. ७ एप्रिल) रोजी आहे. गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर या वार्षिक यात्रेनिमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांना सुरवात झाली आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी पहाटे पाच वाजता श्रींना महामस्तकाभिषेक करण्यात आला.
श्रीमंत अंबरनाथाच्या कावडीचे गुढीपाडव्याच्या शुभमुहुर्तावर पूजन करण्यात आले. गणपती मंदिर, महादेव मंदीर मार्गे अंबरनाथ मंदिर व परत गणपती मंदिरात कावड आणण्यात आली. सायंकाळी सर्व भाविक भक्तांच्या उपस्थितीत अंबरनाथ व जोगेश्वरीच्या साखरपुड्याचा कार्यक्रम पार पडला.
दरम्यान, यावेळी तीर्थक्षेत्र रामदरा शिवालयातील महंत हेमंतपुरी महाराज, हभप विनोद महाराज काळभोर, श्रीमंत अंबरनाथ देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष योगेश काळभोर, पुजारी नंदू भैरवकर, मानकरी गणपत थेऊरकर, सोनवणे बंधू व ग्रामस्थ उपस्थित होते.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
ए. एफ. एम. सी. कॉलेज ऑफ नर्सिंग पुणेच्या वतीने लोणी काळभोर येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन