Thursday, June 25, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

‘मानसिक छळ, कमी पगार आणि कामाचा वाढता ताण’ होत असल्याची लिहिली सुसाईड नोट, फुरसुंगी येथील श्री साई सेवाभावी संस्थेच्या खुले निवारागृहातील कर्मचाऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

विशाल कदमby विशाल कदम
Thursday, 25 June 2026, 11:23

फुरसुंगी, ता. २५ : फुरसुंगी येथील एका खुले निवारागृहात कार्यरत असलेल्या २६ वर्षीय युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना २२ जून रोजी दुपारच्या सुमारास उघडकीस आली आहे. आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या कथित सुसाईड नोटमध्ये संस्थाचालकाकडून होत असलेला मानसिक छळ, कमी पगारात अतिरिक्त कामाचा बोजा आणि करिअर उद्ध्वस्त करण्याच्या धमक्या यांचा उल्लेख करण्यात आल्याने या प्रकरणाने खळबळ उडाली आहे.

अतुल अंकुश लाळगे (वय २६) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. अतुलचा चुलत भाऊ अनिकेत लाळगे यांनी फुरसुंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार संस्थाचालक बालाजी मुस्कवाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अतुल लाळगे हा गेल्या अडीच वर्षांपासून फुरसुंगी येथील श्री साई सेवाभावी संस्था संचलित खुले निवारागृहात कार्यरत होता. त्याने संस्थेच्या आवारात गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याला तातडीने ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र डॉक्टरांनी त्याला दाखलपूर्व मृत घोषित केले.

या घटनेनंतर अतुलचा चुलत भाऊ अनिकेत लाळगे याने फुरसुंगी पोलिसांकडे दिलेल्या फिर्यादीत गंभीर आरोप केले आहेत. अतुलने लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये संस्थाचालक बालाजी मुस्कवाड यांच्याकडून गेल्या अडीच वर्षांपासून कमी पगारावर प्रचंड काम करून घेतले जात असल्याचा उल्लेख आहे. संस्थेत आवश्यक मनुष्यबळ नसताना सर्व जबाबदाऱ्या एकट्याच अतुलवर टाकल्या जात होत्या. मुलांच्या देखभालीपासून कार्यालयीन कामे, कागदपत्रे, इतर संस्थांची कामे आणि वैयक्तिक कामांपर्यंत सर्व जबाबदाऱ्या त्याच्यावर सोपविल्या गेल्याचा दावा करण्यात आला आहे.

 

तसेच संस्थेत घडणाऱ्या कोणत्याही घटनेची जबाबदारी त्याच्यावर टाकली जात होती. काम सोडण्याचा विचार व्यक्त केल्यास त्याच्यावर खोटे गुन्हे दाखल करून आयुष्य उद्ध्वस्त करण्याच्या धमक्या दिल्या जात असल्याचेही सुसाईड नोटमध्ये नमूद असल्याचा आरोप आहे. सततचा मानसिक त्रास, अपमानास्पद वागणूक आणि आर्थिक अडचणींमुळे तो नैराश्यात गेल्याचेही त्यात नमूद करण्यात आले आहे. मृताच्या कुटुंबीयांनीही अतुलने काही दिवसांपूर्वी कामाच्या ठिकाणी होणाऱ्या त्रासाबाबत तक्रारी केल्याचे सांगितले आहे. बहिणीशी झालेल्या संभाषणात त्याने नोकरी सोडण्याची इच्छा व्यक्त केली होती, अशी माहितीही समोर आली आहे.

दरम्यान, या प्रकरणी फुरसुंगी पोलिसांनी संस्थाचालक बालाजी मुस्कवाड यांच्याविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी तक्रार नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे. सुसाईड नोट, संस्थेतील कामकाज आणि संबंधितांच्या जबाबांच्या आधारे पोलिसांकडून सखोल चौकशी करण्यात येत आहे. एका सामाजिक संस्थेत कामाच्या ताणामुळे तरुण कर्मचाऱ्याने आत्महत्या केल्याचा आरोप झाल्याने सामाजिक क्षेत्रातही मोठी खळबळ उडाली आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

“वर्दीत असले तरी मीही एक आई आहे” नरसापूर प्रकरणातील तपास अधिकारी विजयमाला पवार यांची भावुक प्रतिक्रिया…

Thursday, 25 June 2026, 14:33

पुणेकरांनो सावधान! पुढील 3 दिवस ‘यलो अलर्ट’; पावसाचा जोर पुन्हा वाढणार

Thursday, 25 June 2026, 14:17

साखरपुडा झाला, लग्न ठरलं पण होणारी नवरी निघाली ठग; NRI ची 16 लाखांची फसवणूक

Thursday, 25 June 2026, 14:07

तुला काय शिक्षा द्यावी? विचारताचं आरोपी म्हणाला, मी तिला खाऊ द्यायला नेलं होतं, पाय घसरला अन्…; भीमराव कांबळेचं उत्तर ऐकून न्यायाधीशही चक्रावले

Thursday, 25 June 2026, 13:48

येलवडी येथे नवीन वीज मीटर जोडणीसाठी 2 लाखांची लाच घेणाऱ्या महावितरणच्या कर्मचाऱ्याला जामीन; वडगाव मावळ कोर्टाचा मोठा निर्णय..

Thursday, 25 June 2026, 13:27

नसरापूर हादरवणाऱ्या प्रकरणात आरोपी दोषी; नराधमाला फाशी होणार कि जन्मठेप? जाणून घ्या

Thursday, 25 June 2026, 12:36
Next Post

पाटसमध्ये जमिनीच्या वादातून पुतण्यावर काका अन् नातवाचा कोयत्याने हल्ला

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.