Monday, August 31, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

महसूल विभागात ‘लाचखोरी’चा आरोप; माजी सरपंचांचा थेट एल्गार! लोणी काळभोर अप्पर तहसील कार्यालयाबाहेर फ्लेक्स लावून जनजागृती

विशाल कदमby विशाल कदम
Thursday, 20 August 2026, 13:23

लोणी काळभोर, ता. 20 : महसूल विभागातील अधिकाऱ्यांकडून सर्वसामान्य नागरिकांच्या विविध शासकीय कामांसाठी पैशांची मागणी केली जात असल्याचे गंभीर आरोप करत मांजरी बुद्रुकचे माजी सरपंच शिवराज घुले यांनी थेट आक्रमक भूमिका घेतली आहे. घुले यांनी नागरिकांसमवेत लोणी काळभोर अप्पर तहसीलदार कार्यालय, थेऊर मंडल अधिकारी कार्यालय आणि मांजरी बुद्रुक तलाठी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर ‘कामासाठी पैसे मागितल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या 1064 हेल्पलाईनवर तक्रार करा’ असे आवाहन करणारे फ्लेक्स लावल्याने महसूल विभागात खळबळ उडाली आहे.

फेरफार, सातबारा उतारा, बोजा चढविणे-उतरविणे, वारस हक्क नोंदी यांसह विविध महसूल कामांसाठी नागरिकांकडून पैशांची मागणी केली जात असल्याचा आरोप या फ्लेक्सच्या माध्यमातून करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, घुले यांनी संबंधित अधिकाऱ्यांच्या कार्यालयांच्या प्रवेशद्वारावरच हे फलक लावून प्रशासनाला जणू थेट आव्हान दिले आहे.

‘पैसे मागितल्यास 1064 वर तक्रार करा!’

शासकीय कामासाठी कोणत्याही अधिकाऱ्याने अथवा कर्मचाऱ्याने पैशांची मागणी केल्यास नागरिकांनी थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या 1064 हेल्पलाईनवर तक्रार करावी, असे आवाहन घुले यांनी केले आहे. याशिवाय त्यांनी स्वतःचा मोबाईल क्रमांकही फ्लेक्सवर दिला आहे. घुले यांच्या या आक्रमक भूमिकेमुळे महसूल विभागातील कथित गैरप्रकारांचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. मात्र, हे आरोप संबंधित अधिकाऱ्यांनी स्पष्टपणे फेटाळले असून, त्यांच्या म्हणण्यानुसार शासकीय नियमानुसारच कामे केली जात आहेत.

माजी सरपंच शिवराज घुले म्हणाले, “अप्पर तहसीलदार, थेऊर मंडल अधिकारी आणि मांजरी बुद्रुक तलाठ्यांकडून एका ठराविक घटकाला पाठीशी घातले जात आहे. सर्वसामान्य नागरिकांना त्यांच्या हक्काच्या कामासाठी पैशांची मागणी केली जात असल्याच्या तक्रारी वारंवार आल्या आहेत. त्यामुळे नागरिकांना सोबत घेऊन जनजागृतीसाठी हा फलक लावला आहे. अधिकाऱ्यांनी याची दखल घेतली नाही तर तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल.”

 

दरम्यान, महसूल विभागातील कथित गैरप्रकारांबाबत आरोप-प्रत्यारोप सुरू झाले असून, या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून सत्य समोर येणे गरजेचे आहे. याबाबत संबंधित प्रशासनाची अधिकृत भूमिका जाणून घेण्यासाठी लोणी काळभोर अपर तहसील कार्यालयाच्या अपर तहसीलदार तृप्ती कोलते यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, त्यांनी दूरध्वनीवरील कॉलला प्रतिसाद न दिल्याने त्यांची अधिकृत प्रतिक्रिया मिळू शकली नाही.

अप्पर तहसीलदार कार्यालयातील फ्लेक्स अर्धवट फाडला!

लोणी काळभोर येथील अप्पर तहसीलदार कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर लावण्यात आलेला फ्लेक्स काही वेळातच अर्धवट फाडण्यात आल्याने या प्रकाराबाबत उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे. फ्लेक्स नेमका कोणी फाडला, याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

याबाबत लोणी काळभोरच्या अपर तहसीलदार तृप्ती कोलते म्हणाल्या, “अपर तहसीलदार कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर लावण्यात आलेला फलकाचे आम्ही स्वागत करीत आहोत. तो फलक आमच्याकडून लावायला हवा होता. राजकीय लोकांचे फोटो आणि नाव त्यावरती नसायला हवे. हा फलक अत्यंत गरजेचा असून लोकांपर्यत याची जनजागृती होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे अपर तहसील कार्यालयाकडून परिसरात नवीन आणखी फलक लावण्यात येणार आहेत. यामधून लोकांमध्ये जनजागृती होण्यास मदत होणार आहे.”

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

अमेरिकेचा हल्ला अन् इराणचा पलटवार! होर्मुझमध्ये काय घडतंय? जगाच्या तेलपुरवठ्यावर संकटाची चाहूल

Monday, 31 August 2026, 11:15

वाकडमध्ये मद्यपी कारचालकाचा हायव्होल्टेज राडा! पोलिसांनाच शिवीगाळ अन् दमदाटी, पाहा नेमकं काय घडलं?

Monday, 31 August 2026, 10:55

1 सप्टेंबरपासून LPG-PNG ग्राहकांवर नवा नियम लागू! सिलेंडरच्या किमतीपासून e-KYC पर्यंत मोठे बदल; जाणून घ्या ………

Monday, 31 August 2026, 10:34

अंगावर खाकी, मनात जिद्द… पण पतीच्या जाचापुढे हरली! बारामती महिला पोलिसांन उचललं टोकाचं पाऊल

Monday, 31 August 2026, 10:11

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात ! प्रवाशांनी भरलेल्या ट्रॅव्हल्सची कंटेनरला जोरदार धडक; एकाचा जागीच मृत्यू, 10जण जखमी

Monday, 31 August 2026, 9:52

अशोक खरातच्या अडचणी वाढणार? आज कोर्टात होणार महत्वाची सुनावणी; नेमका काय निर्णय?

Monday, 31 August 2026, 9:36
Next Post

पीएमआरडीएच्या विकास परवानगी विभागातील ‘बदलीचा घोळ’ कायम; पदोन्नती झालेले अधिकारी कनिष्ठ पदावर! ‘मलईदार’ खुर्च्यांभोवती संशयाचे वलय

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp