Tuesday, September 29, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

आलेगाव पागा प्रकरण! एकाच दिवशी जिल्हा उपनिबंधकांचे दोन आदेश; ‘या आदेशांचा नेमका अर्थ काय?’ शेतकऱ्यांचा सवाल – उच्चस्तरीय चौकशीची मागणी

योगेश मारणेby योगेश मारणे
Friday, 14 August 2026, 18:03

न्हावरे: आलेगाव पागा (ता. शिरूर) येथील संभाजी सहकारी सोसायटीचे सभासदत्व नाकारल्याने शेतकरी अशोक सुदाम वाघचौरे आणि लता सुदाम वाघचौरे या मायलेकांना सुमारे तीन महिने अडथळे निर्माण करून शेती कर्जापासून वंचित ठेवल्याचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर संभाजी सोसायटीच्या कारभारावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी.अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

दरम्यान,या प्रकरणाला आता वेगळेच वळण मिळाले आहे. ६ जुलै २०२६ रोजी जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून एकाच दिवशी दोन लेखी आदेश काढण्यात आल्याचे उघड झाले आहे.त्यामुळे एकाच दिवशी दोन स्वतंत्र आदेश का काढण्यात आले? या दोन्ही आदेशांचा नेमका अर्थ काय? सभासदत्वासाठी शेतकऱ्याने संभाजी सहकारी सोसायटीकडे रीतसर अर्ज केलेला असताना, पुन्हा दुसऱ्या सोसायटीच्या सभासदत्वाबाबत आदेश देण्याची आवश्यकता का भासली? असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.

तीन महिने शेतकरी मायलेक कर्जापासून वंचित?

वाघचौरे मायलेकांच्या सभासदत्वाच्या प्रश्नामुळे सुमारे तीन महिने कर्जवाटप रखडले. याचीही चौकशी होणे आवश्यक आहे.शेतीच्या हंगामात वेळेवर कर्ज उपलब्ध न झाल्यास शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो.त्यामुळे सभासदत्वाची प्रक्रिया आणि कर्जवाटप यामध्ये नेमका विलंब कुठे झाला,याची जबाबदारी निश्चित करण्याची मागणी होत आहे.

अधिकाऱ्यांच्या खुलाशांमुळे संभ्रम

या प्रकरणात जिल्हा उपनिबंधकांपासून शिरूरच्या सहाय्यक निबंधक कार्यालयापर्यंत वेगवेगळे खुलासे समोर येत असल्याने संभ्रम आणखी वाढला आहे.

 

याप्रकरणी शिरूरचे सहाय्यक उपनिबंधक हरिश्चंद्र कांबळे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी या प्रकरणाची माहिती नसल्याचे सांगण्यात आले.तर जिल्हा उपनिबंधक प्रकाश जगताप यांनी हे प्रकरण आपल्याकडे नसल्याचे वेळकाढू उत्तर दिले. त्यामुळे जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून आदेश काढले गेले असतील,तर त्याची पुढील कार्यवाही कोणत्या कार्यालयाने केली? आदेशांची अंमलबजावणी झाली का? आणि संबंधित प्रकरणाची जबाबदारी नेमकी कोणाकडे आहे? हे प्रश्न आता उपस्थित झाले आहेत.

संबंधित अधिकारी,संचालक मंडळ आणि सचिवांची चौकशी करा.

या संपूर्ण प्रकरणाची केवळ कागदोपत्री चौकशी न करता संबंधित अधिकारी,सोसायटीचे संचालक मंडळ आणि सचिव यांच्या भूमिकेची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी.अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. सभासदत्वाचा अर्ज,त्यावरील निर्णय,कर्जमंजुरी,सातबाऱ्यावर नोंदविण्यात आलेला बोजा,प्रत्यक्ष कर्जवाटप, ६ जुलै २०२६ रोजी काढण्यात आलेले दोन्ही आदेश आणि त्यानंतरची कार्यवाही या सर्व बाबींची कागदपत्रांसह तपासणी आणि उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी होत आहे.

त्यामुळे जबाबदारी निश्चित करून नियमानुसार कठोर कारवाई करावी आणि चौकशी निष्पक्षपणे पूर्ण करावी.अशी मागणी शिरूर तालुक्यातून होत आहे. शेतकऱ्याच्या कर्जाच्या हक्काशी संबंधित हा प्रश्न असल्याने सहकार विभाग आता तरी या प्रकरणातील संपूर्ण वस्तुस्थिती समोर आणणार का,याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

योगेश मारणे

योगेश मारणे

लेखक सुमारे १८ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रामध्ये कार्यरत आहे. दैनिक प्रभात, सामना आणि पुण्यनगरी या वृत्तपत्रांमध्ये बातमीदार म्हणून काम केल्याचा अनुभव आहे. राजकारण, क्राईम आणि शोध पत्रकारिता यामध्ये विशेष कामाचा अनुभव तसेच दोन वर्षांपासून 'पुणे प्राईम न्यूज'मध्ये प्रतिनिधी म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

भरदिवसा भाजप नेत्याच्या पुतण्यावर धारदार शस्त्रांनी हल्ला! 16-17 जणांनी घेरून बेदम मारहाण

Tuesday, 29 September 2026, 21:22

कारेगावात पाण्याच्या प्लांटमध्ये झालेल्या गोळीबारात तरुणाचा खून

Tuesday, 29 September 2026, 19:50

कोट्यवधींच्या घोटाळ्याची फाईल पुन्हा उघडणार? नीरव मोदीचा साथीदार UAEतून भारतात,,CBIच्या ताब्यात

Tuesday, 29 September 2026, 19:32

रेल्वे प्रवाशांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी! तिकीटासोबत आता ओळखपत्र बाळगणंही अनिवार्य नाहीतर भरावा लागणार मोठा दंड

Tuesday, 29 September 2026, 18:54

टॅटूने उलगडलं खुनाचं गूढ! कल्याणीची हत्या, मृतदेहाचे 9 तुकडे कालव्यात; सोशल मीडियामुळे आरोपी जाळ्यात

Tuesday, 29 September 2026, 18:50

सोमेश्वर साखर कारखाना निवडणुकीचा रणसंग्राम अंतिम टप्प्यात ! अर्ज माघारीचा उद्या शेवटचा दिवस ; कोणकोण मैदानात?

Tuesday, 29 September 2026, 18:26
Next Post

दोन मुली झाल्या म्हणून टोमणे अन् मदतीच्या पैशांवर डल्ला! मोशी दुर्घटनेतील मृताच्या पत्नीच्या आत्महत्या प्रकरणात मोठे वळण; सासरच्यांवर गुन्हा दाखल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp