इंदापूर,(पुणे) : पुणे-सोलापूर रेल्वे महामार्गावरील करमाळा तालुक्यातील रामवाडी गेट नंबर 25 वर तब्बल १ कोटी २६ लाख खर्च करून उभारण्यात आलेल्या भुयारी मार्गाचे रस्ता कॉंक्रिटीकरण कामाचे उद्घाटन आज 19 नोव्हेंबर रोजी संपन्न झाले. बाजूच्या भिंतीचे काम प्रगतीपथावर असून काही दिवसात ते पूर्ण होणार आहे. सध्या साखर कारखान्याचा गळीत हंगाम सुरू आहे. अशातच या रस्त्याचे काम झाल्याने परिसरातील शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद द्विगणित झाला आहे.
रामवाडी येथील गेट नंबर 25 येथील भुयारी मार्गावरून ऊस वाहतूक करताना तीन-तीन ट्रॅक्टर पुढे मागे लावून तारेवरील कसरत करावी लागत होती. परंतु या भागातील सामाजिक कार्यकर्ते अजित रणदिवे यांनी सातत्याने माढा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर तसेच रेल्वेचे डि.आर.एम. निरंजनकुमार दोहरे, सिनिअर डी. ई. एन. चंद्रभूषण साहेब, डी.आर.एम.साहेबांचे सचिव ताजुद्दीन हुंडेवाले यांच्याशी सातत्याने पाठपुरावा करून या भुयारी मार्गाला निधी उपलब्ध करून घेऊन मार्गाचे कॉंक्रिटीकरण पूर्ण झाल्याने हा रस्ता ऊस वाहतुकीसाठी व इतर सर्व वाहतुकीसाठी खुला करण्यात आला.
दरम्यान, अजित रंणदिवे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा पदाधिकाऱ्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी सोलापूर जिल्हा परिषदच्या माजी सदस्या सविताराजे भोसले बारामती ऍग्रो कारखान्याचे उपाध्यक्ष सुभाष गुळवे, करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक नागनाथ लकडे, खरेदी विक्री संघाचे संचालक महादेव डुबल, शिवाजी राखुंडे, मनोहर हंडाळ, रयत क्रांती संघटनेचे जिल्हाध्यक्ष संतोष वारगड, गावचे प्रथम नागरिक सरपंच गौरव झांजुणे, माजी सरपंच बाळासाहेब कावळे, सुरेश झांजुर्णे, राजेंद्र धांडे, डॉ. गोरख गुळवे, लतिश पाटील, सुहास गलांडे, बाळकृष्ण सोनवणे, सुरेश झांजुर्णे, गणेश घोरपडे, बिभीषेन गायकवाड, रामभाऊ येडे, बाबु वालेकर, आदि पदाधिकारी व शेतकरी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.