Monday, July 27, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशनचे चौथ्यांदा अध्यक्ष होण्यासाठीच अजितदादांचे भ्रष्टाचारास पाठबळ- पै. संदीप भोंडवे

विशाल कदमby विशाल कदम
Thursday, 9 October 2025, 13:38
Ajit Pawar: Ajit Pawar supported corruption just to become the president of Maharashtra Olympic Association for the fourth time- Prof. Sandeep Bhondve

Photo-Pune Prime News

पुणे,ता.9 : शासनाकडुन तीन नॅशनल गेम्सकरीता सुमारे 12 कोटी 45 लाख रुपयांचा निधी मिळाला होता. परंतु, या निधीचा महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशनने (Maharashtra Olympic Association) हिशोब शासनाकडे सादर न केल्यामुळे यात भ्रष्टाचार झाला आहे. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार (Deputy Chief Minister Ajitdada Pawar) यांना याची संपूर्ण माहिती झाली आहे. स्पोर्ट्स कोड नुसार 3 टर्म अध्यक्षपद भुषवल्यानंतर चौथ्यांदा अध्यक्ष होता येत नाही. तरीसुद्धा अजित दादांनी असोसिएशनच्या निवडणुकीमध्ये अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. अध्यक्ष होण्यासाठी त्यांनी काही पदाधिकाऱ्यांनी केलेल्या भ्रष्टाचाराकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे. असा आरोप भारतीय जनता पार्टी क्रीडा आघाडीचे अध्यक्ष पै.संदीप भोंडवे यांनी केला आहे.

या भ्रष्टाचाराच्या विरोधात संदीप भोंडवे यांनी माजी खासदार रामदास तडस यांच्या मार्गदर्शनाखाली पुण्यात 23 सप्टेंबर रोजी 4 दिवस आमरण उपोषण केले होते. यावेळी महाराष्ट्र राज्य क्रीडा विभागाने ऑलिंपिक असोसिएशनला पत्र काढुन 7 दिवसांमध्ये हिशोब सादर करा. अन्यथा कारवाई करु असे पत्र काढण्यात आले होते. तर आर्थिक गुन्हे अन्वेषणचे सहाय्यक आयुक्त विवेक मासाळ यांनी या भ्रष्टाचाराची तात्काळ चौकशी करु असे आश्वासनदेखील दिले होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawa)r व महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांची मुंबईत बैठक 29 सप्टेंबरला बैठक पार पडली. यावेळी अजित पवारांनी सहाय्यक पोलीस आयुक्त विवेक मासाळ यांना फोन करुन संबंधित तपास सुरु करण्याअगोदर माझी भेट घ्या. असे जाहीरपणे सांगितले होते. त्यामुळे पोलीस प्रशासनाचा तपास संथ झाला आहे. तसेच महाराष्ट्र राज्य क्रीडा विभाग आयुक्त यांनी हिशोब न आल्यानंतर प्रत्यक्ष कारवाई करण्याऐवजी क्रीडा मंत्रालयात पत्रव्यवहार करुन कारवाईची गती संथ केली आहे.

 

दरम्यान, 9 आक्टोंबरला अजित पवार यांनी महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशनच्या निवडणुकीमध्ये अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे . वास्‍तविक भारतीय ऑलिंपिक असोसिएशनच्या घटनेनुसार व नव्याने मंजुर झालेल्या स्पोर्ट्स कोड नुसार 3 टर्म अध्यक्षपद भुषवल्यानंतर कोणालाही चौथ्या टर्मला अध्यक्ष होता येत नाही. परंतु सगळे नियम धुडकावत अजितदादा पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. विशेष म्हणजे त्यांनी महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशनच्या कार्यकारणीस अंधारात ठेऊन महासचिवांकडून घटनेमध्ये बदल करुन घेतला आहे. आणि तो क्लाॅज काढुन टाकला होता. परंतु, भारतीय ऑलिंपिक असोसिएशनच्या नियमानुसार हे कृत्य बेकायदेशीर ठरण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशनचे अध्यक्ष या नात्याने हिशोबाची संपुर्ण जबाबदारी ही अजित पवारांची आहे. दोन ते तीन वर्षाचा कालावधी उलटल्यानंतर देखील हिशोब सादर न केल्याने यामध्ये भ्रष्टाचार झाल्याची जाणीव अजितदादांना आहे. परंतु, महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशनच्या निवडणुकीमध्ये पुन्हा अध्यक्ष होण्यासाठी या घोटाळ्याकडे त्यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे. परंतु, वेळ पडल्यास महाराष्ट्रातील खेळाडु व राज्य संघटना यांना न्याय देण्यासाठी न्यायालयात धाव घेणार आहे. असे गंभीर आरोप करीत संदीप भोंडवे यांनी प्रशासनाला इशारा दिला आहे.

काही संघटनांना बेकायदेशीरपणे मतदानाचे अधिकार

महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशनच्या निवडणुकीमध्ये कोणत्या नियमाने राज्य खेळ संघटनेस मतदानाचे अधिकार असावेत. हे जाणुन बुजून निश्चित केले नसल्याने यामध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे. ज्या संघटनेत वादविवाद आहेत व प्रशासक नेमलेले आहेत. जसे की कब्बडी, नेटबॉल, हॅन्डबाॅल, तायक्वांदो यांना नियम डावलुन मतदान प्रक्रियेत सामावून घेतले आहे. तर जलतरण, कराटे अशा काही संघटनांना निवडणुक प्रक्रियेतुन बाहेर ठेवण्यात आल्याने या निवडणुक प्रक्रियेवर अनेक राज्य खेळ संघटनांनी नाराजी व्यक्त केली आहे. ही निवडणुक पुण्यामध्ये होणार असल्याचे जाहीर केले होते. परंतु, अचानकपणे परीपत्रक काढुन मुंबईत ही निवडणुक निश्चित करण्यात आली आहे. त्यामुळे मतदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

सोलापूर हादरले! रेल्वेसमोर उडी मारून आईसह १४ वर्षांच्या मुलीची आत्महत्या; परिसरात पसरली शोककळा

Sunday, 26 July 2026, 22:57

नीट पेपरफुटीनंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; परीक्षा व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी थेट ‘हाय-पावर टास्क फोर्स’ स्थापन!

Sunday, 26 July 2026, 22:30

शेतकऱ्यांनो सावधान! या ३ चुकांमुळे अडकू शकतो तुमचा २००० रुपयांचा हप्ता; वाचा सविस्तर माहिती

Sunday, 26 July 2026, 21:56

मी ‘रॉ’चा माणूस आहे म्हणत फसवलं! व्यापाऱ्याचे बँक खाते फ्रीज करून लाखांची खंडणी उकळणारा तोतया जेरबंद

Sunday, 26 July 2026, 21:10

माळशेज घाटात थरारक दुर्घटना! तब्बल १०० मीटर रस्ता ५ ते ६ फूट खाली खचला; वाहतूक पूर्णपणे बंद

Sunday, 26 July 2026, 20:16

बारामतीत अपघाताचा थरार! हादरली! भरधाव ट्रकच्या धडकेत सख्ख्या भावांपैकी एकाचा जागीच मृत्यू

Sunday, 26 July 2026, 19:54
Next Post

Crime News: महाराष्ट्र हादरला..! आईच्या प्रेमसंबंधाविषयी मुलाला कळलं, शेतात नेलं अन्... पोटच्या मुलासोबत केलं भयंकर कृत्य

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.