Saturday, September 12, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

रांजणगाव व कारेगावात अतिक्रमणावर धडक कारवाई, रस्त्याने घेतला मोकळा श्वास

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Wednesday, 8 October 2025, 18:10
Encroachments on the Pune-Ahilyanagar highway were removed in Karegaon, Shirur Taluka.

Photo-Pune Prime News

पोपट पाचंगे

रांजणगाव गणपती: पुणे-अहिल्यानगर महामार्गावरील रांजणगाव गणपती व कारेगाव, ता.शिरुर येथील वाहतुकीला अडथळा (Encroachments in Ranjangaon and Karegaon) ठरणारी व अतिक्रमण केलेल्या टपऱ्या, छोटी दुकाने, दुकानांच्या पाट्या व नावाचे फलक काढून टाकत प्रशासनाने संयुक्त कारवाई केली. प्रशासनाच्या या कारवाईचे सर्वसामान्य नागरिकांनी कौतुक केले असून, यामुळे स्थानिक नागरिक व वाहनचालकांनी मोकळा श्वास घेतला आहे.

रांजणगाव येथील अष्टविनायक महागणपती मंदिर मार्ग व महामार्गाच्या दोन्ही बाजूला वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या पायऱ्या, ओटे, टपऱ्या व छोटे व्यावसायिक यांनी केलेली अतिक्रमणे, दुकानाच्या पाट्या व नावाचे फलक जेसीबीच्या सहाय्याने काढून टाकत कारवाई करण्यात आली. तर कारेगाव येथे रांजणगाव एमआयडीसीचे प्रवेशद्वार समजल्या जाणाऱ्या यश इन चौकाच्या दोन्ही बाजूकडील अतिक्रमण केलेली छोटी-मोठी दुकाने, व्यवसायाच्या नावाचे फलक ओटे, पायऱ्या व टपऱ्या आणि पदाधिकाऱ्यांच्या नावाचे फलक जेसीबीच्या सहाय्याने नेस्तनाबूत करण्यात आले.

यामुळे कोंडलेल्या महामार्गाने मोकळा श्वास घेतल्याचे चित्र पहावयास मिळाले. या कारवाईत दोन जेसीबी, एक ट्रॅक्टर व ग्रामपंचायत कर्मचारी सहभागी झाले होते.

 

या कारवाई दरम्यान संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी या दुकानदारांना सूचना देत पुन्हा अतिक्रमण न करण्याच्या सूचना दिल्या. तसेच नियमांचे उल्लंघन केल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाचे ओमप्रकाश निला यांनी यावेळी सांगितले.

या कारवाईप्रसंगी रांजणगाव येथे रस्ते विकास महामंडळाचे ओमप्रकाश निला यांच्यासह रांजणगावचे उपसरपंच श्रीकांत पाचुंदकर, पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे, कामगार तलाठी बी.आर.नरवडे, ग्रामपंचायत सदस्य अनिल दूंडे, निलेश लांडे, नेताजी फंड यांसह ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामस्थ तर कारेगाव येथे रस्ते विकास महामंडळाचे ओमप्रकाश निला, पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे, ग्रामपंचायत अधिकारी के.बी.बिबे,नूतन उपसरपंच नागेश शेलार, संदीप नवले, युवा उद्योजक शुभम नवले, संदीप गवारे, कामगार तलाठी दीपक गांगर्डे यांसह ग्रामपंचायत कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळ व संबंधित विभाग यांनी संयुक्त केलेल्या कारवाईवेळी रांजणगाव पोलिसांच्या वतीने चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

दरम्यान, अतिक्रमण हटविलेल्या धडाकेबाज कारवाईचे स्थानिक नागरिक व वाहनचालकांनी स्वागत केले असून, यामुळे कारेगाव व रांजणगाव गणपती येथे दररोज होणारी वाहतूक कोंडी कमी होऊन वाहतूक सुरळीत होण्यास मदत होणार असल्याचे रांजणगावचे पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांनी सांगितले.

 

 

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

मुंबईकडे कूच करण्याआधीच जरांगेंना मोठा धक्का! गुणरत्न सदावर्तेंची थेट मोठी घोषणा; आंदोलनाची चिंता वाढली

Saturday, 12 September 2026, 19:11

मराठ्याचं भगव वादळ मुबंईत धडकण्याआधीच ठिणगी! जरांगेंच्या घोषणेनंतर तासाभरातच फुट,मुंबईच्या वाटेत काटे

Saturday, 12 September 2026, 17:50

प्रथमेशची आत्महत्या अन् गावात मृत्यूचं सत्र! 10 दिवसांत 3 शेतकऱ्यांचा मृत्यू, कर्जाचा विळखा कायम

Saturday, 12 September 2026, 17:26

प्रतीक्षा संपली! अखेर ‘माधुरी’ नांदणीच्या मठात दाखल,आगमन होताच हजारो कोल्हापूरकरांचा जल्लोष

Saturday, 12 September 2026, 16:43

भ्रष्टाचाराला अभय? ’आलेगाव पागाच्या तीनही शेतकरी सोसायट्यांच्या कारभारावर गंभीर आरोप; ‘तक्रारी, त्रुटी उघड होऊनही कारवाई नाही’

Saturday, 12 September 2026, 16:03

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! गणेशोत्सवात 3 दिवस ‘या’ मार्गांवर निर्बंध, जाणून घ्या पर्यायी मार्ग

Saturday, 12 September 2026, 15:42
Next Post
Uruli Kanchan News: Accident involving not three but four vehicles on Pune - Solapur highway; Pickup rams into school bus, two-wheeler driver seriously injured

Uruli Kanchan News: पुणे - सोलापूर महामार्गावर तीन नाही तर चार वाहनांचा अपघात; पिकअपमधील सळ्या स्कूल बसमध्ये घुसल्या तर दुचाकी चालक गंभीर जखमी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp