उरुळी कांचन : पुणे – सोलापुर राष्ट्रीय महामार्ग ओलांडताना दुचाकीच्या धडकेत सोरतापवाडी (ता. हवेली) येथील एका कामगार महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. शनिवारी (ता. 02) सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास सोरतापवाडी गावचे हद्दीतील भारत बेंज कंपनी समोर हा अपघात झाला आहे. याप्रकरणी एका अज्ञात दुचाकी चालकावर उरुळी कांचन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुनंदा जयवंत बाबर (रा.खोरावडे वस्ती, सोरतापवाडी, ता. हवेली) असे अपघातात मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी सुनिता संतोष बाबर( वय- 36, रा.खोरावडे वस्ती) यांनी सोमवारी (ता. 04) उरुळी कांचन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात दुचाकी चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी सायंकाळी सुनिता बाबर त्यांची चुलत सासू सुनंदा बाबर व जाऊ अर्चना बाबर या तिघीजण शनिवारी कामानिमित्त सोरतापवाडी येथील म्हस्के वस्ती येथे गेले होते. सायंकाळी काम उरकून तिघीजणी या काम संपवुन पायी चालत निघाल्या होत्या. यावेळी सोलापुर- पुणे महामार्गावर भारत बेंझ कंपनी समोरून चुलत सासु सुनंदा ह्या पुढे चालत रस्ता ओलांडत होत्या.
यावेळी सोलापुर बाजु कडून पुणे बाजुकडे जाणाऱ्या एका मोटार सायकलने सासू सुनंदा बाबर यांना जोरात धडक दिली. त्यामुळे त्या गंभीर जखमी होवुन रोडवर बेशुध्द होवुन खाली पडल्य. यावेळी अंधार असल्याने त्यांना धडक देणारी मोटार सायकल पुणे दिशने निघुन गेली होती.
दरम्यान, जखमी सुनंदा बाबर यांना उपचारासाठी रुग्णवाहिकेतून विश्वराज हॉस्पीटाल लोणी काळभोर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारापूर्वीच त्यांचे निधन झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. यावेळी मयत यांचा मुलगा गणेश जयवंत बाबर हे देखील हजर होते. अंत्यविधी व धार्मिक विधी झाल्यावर सोमवारी (ता. 04) फिर्याद देण्यात आली आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक प्रविण कांबळे करीत आहेत.