Saturday, September 12, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

अखेर मार्ग निघालाच! टोलनाक्याच्या वादानंतर नीरा-जेजुरी-मोरगाव पीएमपी बससेवा पुन्हा सुरू

Shreya Varkeby Shreya Varke
Monday, 3 August 2026, 12:41

पुणे : पालखी महामार्गावरील नव्या टोलनाक्यामुळे काही दिवसांपासून बंद असलेली नीरा, जेजुरी आणि मोरगाव या भागातील पीएमपी बससेवा पुन्हा सुरू करण्यात आली आहे. टोल शुल्काचा अतिरिक्त भार टाळण्यासाठी पीएमपी प्रशासनाने नवीन पर्यायी मार्गाचा अवलंब केला असून, त्यामुळे ग्रामीण भागातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.

महामार्गावरील नव्या टोलनाक्यावर प्रत्येक बसफेरीसाठी सुमारे 350 रुपयांचे शुल्क आकारले जात होते. आधीच आर्थिक अडचणीत असलेल्या पीएमपीने टोलमाफीची मागणी संबंधित यंत्रणेकडे केली होती. मात्र ती मान्य न झाल्याने काही दिवसांसाठी या मार्गांवरील बससेवा थांबवण्यात आली होती.

बससेवा बंद झाल्यामुळे नीरा, जेजुरी, मोरगाव आणि आसपासच्या गावांतील नागरिकांना पुण्यात ये-जा करण्यासाठी खासगी वाहनांवर अवलंबून राहावे लागत होते. त्यामुळे प्रवाशांचा प्रवास खर्च वाढला होता. तसेच वेळेचाही मोठा अपव्यय होत असल्याने नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले होते.

या समस्येवर तोडगा काढण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी आणि संबंधित अधिकाऱ्यांमध्ये चर्चा झाली. त्यानंतर बेलसर फाटा मार्गे बस चालवण्याचा निर्णय घेण्यात आला. या मार्गावर टोल भरावा लागत नसल्याने पीएमपीचा अतिरिक्त खर्च वाचणार असून सेवा सुरळीत ठेवणे शक्य झाले आहे.

 

पीएमपी प्रशासनाच्या माहितीनुसार, या मार्गांवर एकूण 15 बस प्रवाशांच्या सेवेत दाखल करण्यात आल्या आहेत. दिवसभरात या बस मिळून 94 फेऱ्या पूर्ण करणार आहेत. त्यामध्ये जेजुरी मार्गावर 10 बस, नीरा मार्गावर 4 बस आणि मोरगाव मार्गासाठी 1 बस उपलब्ध करण्यात आली आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

नांदूर येथील गिट्स कंपनीतून तांब्याची केबल चोरणारा चोरटा यवत पोलिसांच्या जाळ्यात; 1 लाखाचा मुद्देमाल जप्त

Saturday, 12 September 2026, 15:17

मराठ्याचं वादळ मुबंईत धडकणार! मनोज जरांगेंचा मोर्चा कधी, कुठून आणि कोणत्या मार्गाने? ए टू झेड’ माहिती एका क्लिकवर

Saturday, 12 September 2026, 15:05

डीजे बंदीचा मुद्दा तापणार?विद्यानंद बापटाचीं प्रशासनाला कडक नोटीस, ‘या’ 3 मुद्द्यांवर तातडीने बंदीची मागणी

Saturday, 12 September 2026, 14:45

आमदार ज्ञानेश्वर कटके यांच्या हस्ते पूर्व हवेलीत सुमारे 5 कोटींच्या विकासकामांचे रविवारी भूमिपूजन; पालखीतळासाठी 2 कोटी 15 लाखांचा निधी – सभापती युवराज काकडे यांची माहिती

Saturday, 12 September 2026, 13:54

महाराष्ट्र विधानमंडळाच्या सार्वजनिक उपक्रम समितीचा विदर्भ दौरा; विकासासाठी आमदार ॲड. राहुल कुल यांनी घेतला आढावा

Saturday, 12 September 2026, 13:48

हवेलीकरांसाठी मोठी बातमी! विकासकामांसाठी निधी मंजूर; 13 सप्टेंबरला होणार भूमिपूजन

Saturday, 12 September 2026, 13:01
Next Post

तुकोबांचा पालखी सोहळा पुढे सरकताच, पुणे–सोलापूर महामार्गावर अनधिकृत होर्डिंग्जने पुन्हा डोके वर काढले; दुर्घटना झाल्यास जबाबदार कोण?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp