Saturday, September 12, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

आमदार ज्ञानेश्वर कटके यांच्या हस्ते पूर्व हवेलीत सुमारे 5 कोटींच्या विकासकामांचे रविवारी भूमिपूजन; पालखीतळासाठी 2 कोटी 15 लाखांचा निधी – सभापती युवराज काकडे यांची माहिती

विशाल कदमby विशाल कदम
Saturday, 12 September 2026, 13:54

लोणी काळभोर, ता. 12 : हवेली तालुक्याच्या पूर्व भागातील विविध गावांच्या विकासाला मोठी चालना मिळणार असून, पंचायत समितीच्या माध्यमातून मंजूर झालेल्या विविध विकासकामांचे भूमिपूजन रविवारी (ता. 13) आमदार ज्ञानेश्वर कटके यांच्या हस्ते होणार आहे. सकाळी 9 ते दुपारी 2 या वेळेत आव्हाळवाडी, मांजरी खुर्द, कोलवडी, थेऊर, कुंजीरवाडी, आळंदी म्हातोबा, कोरेगाव मूळ, लोणी काळभोर, उरुळी कांचन आणि कदमवाकवस्ती या भागांत सुमारे 5 कोटी 46 लाख 28 हजार रुपयांच्या विविध विकासकामांचा शुभारंभ करण्यात येणार आहे. अशी माहिती हवेली पंचायत समितीचे सभापती युवराज हिरामण काकडे यांनी दिली.

सभापती युवराज काकडे यांच्या पुढाकारातून मंजूर झालेल्या या विकासकामांमध्ये रस्ते दुरुस्ती, बंदिस्त गटारे, सांडपाणी व्यवस्थापन, स्वच्छता, पाणीपुरवठा, समाजमंदिर, सभामंडप तसेच विविध पायाभूत सुविधांच्या कामांचा समावेश आहे. त्यामुळे पूर्व हवेलीतील नागरिकांना मूलभूत सुविधा उपलब्ध होण्यास मोठी मदत होणार असून, ग्रामीण भागातील विकासकामांना गती मिळणार आहे. आव्हाळवाडी येथे पंचायत समितीच्या निधीतून 5 लाख रुपयांची नळ पाणीपुरवठा वितरण व्यवस्था करण्याच्या कामाचे भूमिपूजन सकाळी 9 वाजता होणार आहे. त्यानंतर मांजरी खुर्द येथे 5 लाख रुपयांच्या पायाभूत सुविधा कामाचे, तर कोलवडी येथे 5 लाख रुपयांची गटारलाईन टाकण्याच्या कामाचे भूमिपूजन करण्यात येणार आहे.

थेऊरमध्ये सव्वा कोटींहून अधिक रुपयांची कामे

थेऊर येथे सकाळी 10.30 वाजता विविध विकासकामांचे भूमिपूजन होणार आहे. यामध्ये स्वच्छता विषयक कामे (5.50 लाख), समाजमंदिर सुधारणा (1 लाख), भिलवस्ती येथे सभामंडप व समाजमंदिर बांधणे (10 लाख), थेऊर-नायगाव शिवरस्ता दुरुस्ती (16.46 लाख), भीमनगर-इंदिरानगर अंतर्गत रस्ता (15.50 लाख), सांडपाणी व्यवस्थापन (70.80 लाख) तसेच थेऊर रोड-राजबाग रस्ता, ग्रा.मा. 112, एमआयटी कॉलेज ते रा.म. 9 लोणी स्टेशन (थेऊर हद्द) या रस्त्याच्या सुधारण्यासाठी 50 लाख रुपयांच्या कामाचा समावेश आहे.

 

कुंजीरवाडीत सांडपाणी व्यवस्थापनाला प्राधान्य

कुंजीरवाडी येथे सकाळी 11.30 वाजता स्वच्छता विषयक कामांसाठी ५ लाख, सांडपाणी व्यवस्थापनासाठी 53.49 लाख आणि बाजारतळ परिसर काँक्रीटीकरणासाठी 10.85 लाख रुपये, अशा विविध कामांचा शुभारंभ करण्यात येणार आहे. आळंदी म्हातोबा येथे दुपारी 12 वाजता 10 लाख रुपयांचे पायाभूत सुविधा काम, 12.29 लाख रुपयांचे सांडपाणी व्यवस्थापन आणि हनुमंत जवळकर ते पानमळा शिवरस्ता करण्यासाठी 10.72 लाख रुपये खर्चाच्या कामांचे भूमिपूजन होणार आहे.

लोणी काळभोर, उरुळी कांचन आणि कदमवाकवस्तीलाही निधी

लोणी काळभोर ग्रामपंचायत परिसरात 9.67 लाख रुपयांचे पायाभूत सुविधा काम आणि 5 लाख रुपयांची स्वच्छता विषयक कामे, तर उरुळी कांचन येथे 5 लाख रुपयांचे बंदिस्त गटर आणि 5 लाख रुपयांची स्वच्छता विषयक कामे करण्यात येणार आहेत. कदमवाकवस्ती येथे दुपारी 2 वाजता कार्यक्रमाची सांगता होणार असून, गावांतर्गत बंदिस्त गटर व्यवस्थेसाठी 5 लाख रुपये आणि पायाभूत सुविधांसाठी 10 लाख रुपयांच्या कामांचा शुभारंभ करण्यात येणार आहे. तसेच कोरेगाव मूळ ग्रामपंचायतीमध्ये 5 लाख रुपयांच्या पायाभूत सुविधा कामाचे भूमिपूजन होणार आहे.

पालखीतळासाठी तब्बल 2 कोटी 15 लाखांचा निधी

कदमवाकवस्ती येथील पालखीतळ परिसराच्या विकासालाही विशेष प्राधान्य देण्यात आले आहे. सोलापूर रोड-पांडवदंड रस्ता ते पालखीतळ जोडरस्ता सुधारण्यासाठी 1 कोटी 81 लाख रुपये, पालखीतळ ते ओढ्यापर्यंत रस्ता करण्यासाठी 24 लाख रुपये आणि पालखीतळ सुधारणेसाठी 10 लाख रुपये, असा एकूण 2 कोटी 15 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या विकासकामांमुळे पूर्व हवेलीतील विविध गावांमधील रस्ते, स्वच्छता, पाणीपुरवठा, सांडपाणी व्यवस्थापन आणि पायाभूत सुविधांचे प्रश्न मार्गी लागण्यास मदत होणार आहे.

दरम्यान, ‘टप्पा-२’च्या माध्यमातून आणखी काही विकासकामांना मंजुरी देण्यात येणार असून, हवेली तालुक्यातील प्रलंबित विकासकामांना प्राधान्याने निधी उपलब्ध करून दिला जाईल, अशी ग्वाही सभापती युवराज काकडे यांनी दिली. त्यामुळे पूर्व हवेलीच्या विकासाचा वेग आगामी काळात आणखी वाढण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. या भूमिपूजन कार्यक्रमास आमदार ज्ञानेश्वर कटके, सभापती युवराज हिरामण काकडे, पंचायत समिती व जिल्हा परिषद सदस्य, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पक्षाचे प्रमुख पदाधिकारी तसेच ग्रामस्थ उपस्थित राहणार आहेत.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

डीजे बंदीचा मुद्दा तापणार?विद्यानंद बापटाचीं प्रशासनाला कडक नोटीस, ‘या’ 3 मुद्द्यांवर तातडीने बंदीची मागणी

Saturday, 12 September 2026, 14:45

आमदार ज्ञानेश्वर कटके यांच्या हस्ते पूर्व हवेलीत सुमारे 5 कोटींच्या विकासकामांचे रविवारी भूमिपूजन; पालखीतळासाठी 2 कोटी 15 लाखांचा निधी – सभापती युवराज काकडे यांची माहिती

Saturday, 12 September 2026, 13:54

महाराष्ट्र विधानमंडळाच्या सार्वजनिक उपक्रम समितीचा विदर्भ दौरा; विकासासाठी आमदार ॲड. राहुल कुल यांनी घेतला आढावा

Saturday, 12 September 2026, 13:48

हवेलीकरांसाठी मोठी बातमी! विकासकामांसाठी निधी मंजूर; 13 सप्टेंबरला होणार भूमिपूजन

Saturday, 12 September 2026, 13:01

जनावरांसाठी बांधलेल्या दवाखान्यात माणसांवर उपचार; 24 गावांतील लोकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर

Saturday, 12 September 2026, 12:16

Baramati News: मैत्रिणीकडे जाण्याच्या बहाण्याने घर सोडलं, पुढे घडलं धक्कादायक! पोलिसांच्या समुपदेशनानंतर सत्य आलं समोर

Saturday, 12 September 2026, 11:53
Next Post

डीजे बंदीचा मुद्दा तापणार?विद्यानंद बापटाचीं प्रशासनाला कडक नोटीस, ‘या’ 3 मुद्द्यांवर तातडीने बंदीची मागणी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp