अक्षय टेमगिरे

कारेगाव :शिरूर तालुक्यातील कारेगाव येथे खेळून घरी परतणाऱ्या एका अल्पवयीन मुलीला बोलावून घरात नेल्याचा आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे.

या प्रकरणी रोहिदास दत्तात्रय वाकचौरे वय ६५, रा. कारेगाव, ता. शिरूर, जि. पुणे, मूळ रा. वासुंदे, ता. पारनेर, जि. अहिल्यानगर याच्याविरुद्ध रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवार दि. १८ ऑक्टोबर रोजी सकाळी सुमारे १० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली असून शेजारी खेळण्यासाठी गेलेली अल्पवयीन मुलगी खेळून घरी परतत असताना आरोपीने तिला वाटेत आवाज देऊन बोलावले त्यानंतर तिला आपल्या घरात नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्याचा तसेच अप्राकृतिक कृत्य करण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे.
या प्रकरणी पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी दिलेल्या फिर्यादीवरून रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा विविध कलमानसह पोक्सो सह अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यातील संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या गंभीर प्रकरणाचा पुढील तपास शिरूर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र भोसले करीत आहेत असून. रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कुमार कदम यांनी याबाबत माहिती दिली आहे.







