Wednesday, September 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

743 हेक्टर शेती वाचली! पाबळ-खैरेनगर-धामारी एमआयडीसीच्या प्रक्रियेला मुख्यमंत्र्यांचा ब्रेक

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Wednesday, 2 September 2026, 13:11

पोपट पाचंगे

पाबळ: पाबळ – खैरेनगर – धामारी ‘एमआयडीसी’ ला तात्काळ स्थगिती, ७४३ हेक्टर शेती क्षेत्रातील शेतकऱ्यांना दिलासा
रांजणगाव गणपती/प्रतिनिधी – शिरुर तालुक्यातील पाबळ, खैरैनगर व धामारी येथील नियोजित महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) प्रकल्पाच्या संपादित करण्याच्या प्रशासकीय कारवाईसह सर्व प्रक्रियेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ स्थगिती दिली. यामुळे या तिन्ही गावातील सुमारे ७४३ हेक्टर शेतजमिन क्षेत्रातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

या महत्वपूर्ण विषयाबाबत माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील व सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री मेघना बोर्डीकर – साकोरे यांनी पाबळ, धामारी व खैरैनगर येथील बाधित शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळासह मुख्यमंत्री फडणवीस यांची मंत्रालय, मुंबई येथे प्रत्यक्ष भेट घेतल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी या प्रस्तावित संपूर्ण भूसंपादन प्रक्रियेला आणि ७/१२ वरील नोंदींना तात्काळ स्थगिती देण्याचा निर्णय घेतला.
पाबळ, खैरैनगर व धामारी या गावातील एकूण ७४३.५७५५ हेक्टर क्षेत्रावर एमआयडीसी अधिनियम १९६१ च्या नियमांनुसार ‘अधिसूचित क्षेत्र’ असा शेरा ७/१२ च्या इतर अधिकारात नोंदवण्याचे निर्देश तहसीलदार शिरूर यांना जून २०२६ मध्ये देण्यात आले होते.

या गावातील बागायती शेत जमिनीवर एमआयडीसीचे शेरे टाकण्यास सुरुवात झाल्याने या तिन्ही गावातील शेतकरी व व ग्रामस्थांमध्ये तीव्र असंतोष आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते.या निर्णयाविरोधात स्थानिक शेतकऱ्यांनी माजी गृहमंत्री वळसे पाटील यांची भेट घेऊन या विषयासंदर्भात लक्ष घालण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार वळसे पाटील व सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री बोर्डीकर – साकोरे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना पत्र लिहून बैठक घेण्याची मागणी केली होती, त्यानुसार मंगळवारी, दि.१ मंत्रालय, मुंबई येथे झालेल्या बैठकीत वळसे पाटील व बोर्डीकर यांनी शेतकऱ्यांची बाजू प्रभावीपणे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या निदर्शनास आणून दिली.

 

जनभावना आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांचे होणारे अतोनात नुकसान विचारात घेऊन वळसे पाटील व बोर्डीकर यांच्या मागणीवर मुख्यमंत्र्यांनी पाबळ, खैरैनगर व धामारी येथील ७/१२ उताऱ्यावर तसेच फेरफार पत्रावर कोणत्याही प्रकारचा ‘अधिसूचित क्षेत्र’ किंवा भूसंपादनाचा शेरा मारण्याच्या कारवाईला तात्काळ स्थगिती दिल्याने या भागातील शेतकरी वर्गाला मोठा दिलासा मिळाला आहे.

पाबळ,धामारी व खैरेनगर या तिन्ही गावातील बागायती शेतजमिनी एमआयडीसीकरिता संपादित करु नये, म्हणून स्थानिक शेतकऱ्यांनी मोठा संघर्ष केला. आम्ही ही बाब माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट घेऊन त्यांच्यासमोर मांडली. वळसे पाटील व मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्थानिक शेतकऱ्यांसमवेत घेतलेल्या बैठकीत एमआयडीसी प्रकल्पाच्या सर्व प्रक्रियेला तूर्तास स्थगिती दिल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाल्याचे शेतकरी ज्ञानेश्वर खैरे यांनी सांगितले.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

पुणेकरांसाठी महागुड न्यूज! बाह्य रिंगरोडच्या पश्चिम टप्प्याचे ३० टक्के काम पूर्ण; डिसेंबरपर्यंत ६५ टक्के काम करण्याचे मोठे लक्ष्य

Wednesday, 2 September 2026, 18:33

Big Breaking: ओबीसी एल्गार मोर्चाला तात्पुरता ब्रेक! बावनकुळेंच्या फोननंतर लक्ष्मण हाकेंचा निर्णय, मुंबईत मुख्यमंत्र्यांसोबत बैठकीचे आश्वासन..

Wednesday, 2 September 2026, 17:55

राम मंदिराला मिळाले पहिले CEO! 38 वर्षे हवाई दलात सेवा केलेल्या जितेंद्र मिश्रा यांच्यावर मोठी जबाबदारी

Wednesday, 2 September 2026, 17:55

“महिला आरक्षणाची सुरुवात करणारी काँग्रेसच!” पृथ्वीराज चव्हाणांचं वक्तव्य

Wednesday, 2 September 2026, 17:39

उरुळी कांचन येथे रिक्षातून उजव्या बाजूने उतरला अन् थेट टेम्पोखाली चिरडला; अपघातात एकाचा जागीच मृत्यू..

Wednesday, 2 September 2026, 17:38

हडपसरमध्ये तरुणावर चौघांचा हल्ला! वाद मिटवायला बोलावलं अन् कोयत्याने पाठीवर वार केला

Wednesday, 2 September 2026, 17:19
Next Post

पगार वाढणार? केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या DA बाबत मोठी अपडेट; ‘इतक्या’ टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp