लोणी काळभोर : मोबाईलवर पीएम किसान ॲपची बनावट लिंक पाठवून सायबर भामट्यांनी एका दुकानदाराच्या बँक खात्यातून 50 हजार रुपयांची रक्कम लंपास केली आहे. तसेच मोबाईल हॅक करून घेत नातेवाईकांच्या मोबाईलवर बनावट फोटो पाठवण्यात आल्याची माहिती मिळत आहे. याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज देण्यात आला आहे.
मिळलेल्या माहितीनुसार, शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा १७ वा हप्ता नुकताच डीबीटीद्वारे वितरीत करण्यात आला आहे. तसंच १८व्या हप्त्याची यादी देखील पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर आता प्रकाशित करण्यात आली. या संधीचा फायदा घेत अज्ञात सायबर भामट्यांनी पीएम किसान योजनेची बनावट ॲप लिंक बनवली व ती काही ठराविक ग्रुपवर शेअर केली.
कुंजीरवाडी ग्रामपंचायत विजय गायकवाड व सागर तुपे हे मोबाईलवर व्हॉटसॲप चालवत असताना त्यांना एका ग्रुपमध्ये पीएम किसान ॲपची लिंक दिसून आली. यावेळी गायकवाड यांनी ही लिंक ओपन केली यावेळी त्यांचा मोबाईल हॅक करण्यात आला व व्हॉट्सअॅपचा ताबा सायबर भामट्याने घेतला व ती लिंक नातेवाईक व त्यांच्या मोबाईलमध्ये असेलेल्या ग्रुपवर पाठवण्यात आली. यावेळी विजय गायकवाड व त्यांच्या काही नातेवाईकांनी मोबाईलच्या व्हॉटसॲपवर आलेले ॲप्लिकेशन मोबाईलमध्ये ओपन केले.
यावेळी नातेवाईकांनी फोन करून गायकवाड यांना त्यांच्या बाबत घडलेली माहिती दिली की, यावेळी गायकवाड यांनी मोबाईल हॅक झाला व त्यांच्या मोबाईल मधील सर्व व्हॉटसॲप, व इतर डेटा हा आपोआपच दुसऱ्याणा पाठवला जात असल्याची माहिती दिली. आपली फसवणूक झाली असल्याचे गायकवाड व त्यांच्या नातेवाईकांच्या लक्षात आल्यावर गायकवाड यांनी सर्व नातेवाईकांना याची माहिती दिली.
दरम्यान, गायकवाड फोन करीत असतानाच त्यांना पुण्यातील दुकानदाराचे 50 हजार रुपयांची सायबर चोरट्याने फसवणूक करून बँक खात्यातून काढून घेतले होते. तर काही नागरिकांचे मोबाईल हॅक करून त्या नातेवाईकांचे अश्लील फोटो बनवून नातेवाईकांना पाठवण्यात आले. याप्रकरणी गायकवाड यांनी तातडीने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलीस अधिकारी संभाजी देवीकर यांनी तातडीने दखल घेऊन हॅकरचा ॲक्सिस तोडला.
याबाबत बोलताना विजय गायकवाड म्हणाले, “मोबाईलवर येणारी पीएम किसान ॲपची बनावट लिंक असून कोणीही अशा लिंक अथवा ॲप उघडू नये त्यामुळे तुमची व तुमच्या नातेवाईकांची फसवणूक होऊ शकते. सोशल मीडियावर अशा कोणत्याही ॲपच्या लिंकला क्लिक करू नये आणि अशी फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यास तात्काळ लोणी काळभोर पोलिसांशी संपर्क करावा असे आवाहन पोलिसांनी व गायकवाड यांनी यावेळी केले.