दौंड, (पुणे) : दौंड तालुक्यातील राजेगाव येथील एका २९ वर्षीय तरुणाची ऊस तोडणीसाठी 20 जोडपी देतो असे सांगुन नंदुरबार येथील तिघांनी तब्बल चार लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी दौंड पोलीस ठाण्यात तिघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ६ ऑगस्ट २०२२ ते २६ मार्चपर्यंत राजेगाव (ता. दौंड) येथे ही घटना घडली आहे.
सुनिल दाज्या पटले, सुनिल अर्जुन पावरा (दोघे रा. कुकातर तांडा पांडा पो. सुरवाणी ता. अक्राणी (धडगाव) जि. नंदुरबार), किसन सोन्या वळवी (रा. जामनवई, पो. सुरवाणी ता. अक्राणी (धडगाव) जि. नंदुरबार) अशी फसवणूक केलेल्या तिघांची नावे आहेत. याप्रकरणी मनोज मधुकर जामले (वय – २९, उस वाहतुक रा. राजेगाव ता. दौंड) यांनी मंगळवारी (ता. २६) दौंड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मनोज जामले यांना आरोपींनी ऊस तोडणीसाठी २० जोडपी देतो असे सांगुन ४ लाख ०३ हजार ५०० रुपये एवढी रक्कम वेळोवेळी त्यांना रोख तसेच ओनलाईन स्वरूपात वेळवेगळया खाते नंबरवर दिली. त्यांनी मजुर देण्यास टाळाटाळ करून जामले यांची आर्थिक फसवणुक केल्याप्रकरणी त्याच्यावर दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस हवालदार लोहार करीत आहेत.