न्हावरे: शिरूर तालुक्यातील शिरसगाव काटा येथे किशोर दत्तात्रेय चव्हाण( वय-३७) यांनी राहत्या घरी साडीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना मंगळवारी (दि. ११) सकाळी घडली.

किशोर चव्हाण यांनी राहत्या घरी गळफास घेतल्याचे त्यांच्या कुटुंबीयांच्या निदर्शनास आले. त्यानंतर त्यांना उपचारासाठी मांडवगण फराटा येथील वरद विनायक हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र,डॉक्टरांनी तपासणीपूर्वीच त्यांना मृत घोषित केले.

या घटनेची शिरूर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. पुढील तपास शिरूर पोलीस करीत असून,आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. असे शिरूर पोलिसांनी सांगितले.








