पुणे : सध्या राज्यभर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या ना त्या कारणाने चर्चेत आहे. त्यात या योजनेला राज्यातून उत्स्पुरपणे प्रतिसाद मिळत असून दौंड तालुक्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत भरण्यात आलेल्या अर्जापैकी तब्बल 26 हजार 923 अर्ज मंजूर करण्यात आले आहेत. फक्त 79 अर्ज नामंजूर करण्यात आले आहेत. तर इतर अर्जांची तपासणी सुरू असून लवकरच ते काम पूर्ण होईल अशी माहिती दौंड पंचायत समितीचे प्रकल्प विकास अधिकारी अभिमान माने यांनी दिली.
तसे पाहता ग्रामीण भागात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला महिलांचा मोठा प्रतिसाद मिळाला असल्याचे चित्र आहे दौंड तालुक्यात दि. ३ ऑगस्ट पर्यंत 52 हजार अर्ज ऑनलाइन आणि ऑफलाईन पद्धतीने दाखल झाले आहेत. या अर्जांपैकी 28 हजार अर्जांची छाननी आणि तपासणी करून 26 हजार 923 अर्ज आतापर्यंत मंजूर करण्यात आले आहे. त्यातील 1 हजार 78 अर्ज हे तात्पुरते अपात्र ठरवण्यात आले असून त्यांनी एडिट करून पुन्हा अर्ज अपलोड करण्याची संधी आहे. त्यातील काही 79 अर्ज हे नामंजूर करण्यात आले आहेत. तर 28 हजार 500 अर्जामध्ये अनेक त्रुटी आढळून आल्या आहेत.
या अर्जांची छाननी आणि तपासणी सुरू आहे. उर्वरित अर्ज ही लवकरच तपासणी करण्याचे काम दौंड पंचायत समितीत युद्ध पातळी सुरू आहे. त्यासाठी दौंड पंचायत समितीचे गट विकास अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची टीम काम करीत आहे. ज्या लाभार्थी महिलांनी या योजनेसाठी अर्ज दाखल केले नाहीत. अशांनी 31 ऑगस्ट पूर्वी लवकरात लवकर अर्ज दाखल करावेत असे आवाहन दौंड पंचायत समिती प्रकल्प अधिकारी अभिमान माने यांनी केले आहे.