पुणे : एका इसमाने (Pune Crime) आपल्या विकृतीने सांस्कृतिक (Pune News) नगरी असलेल्या पुण्याची मान शरमेने खाली घातली आहे. अंगात पशू संचारल्याप्रमाणे या इसमाने रस्त्यावरच्या एका भटक्या कुत्र्याला आपल्या घरात नेऊन त्याच्यावर अनैसर्गीक संभोग केल्याची घटना घडली आहे. ही घटना पुण्यातील वडारवाडी परिसरात घडली असून या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. चतुःश्रृंगी पोलिसांनी नराधमाला अटक केली आहे.

श्यामराव धोत्रे (रा. वडारवाडी पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी प्राणीमित्र संजय रामचंद्र शिंदे (वय-59, मॉडेल कॉलनी, शिवाजीनगर पुणे) यांनी चतुःश्रृंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी संजय शिंदे व त्यांच्या ग्रुपमधील सदस्य मॉडेल कॉलनी भागातील सर्व अनीमलचे खाण्याचे व त्यांच्यावर औषधउपचार करण्याचे काम करीत आहेत. परंतु, त्यांना मॉडेल कॉलनी परिसरातील एक डॉग मागील काही दिवसापासुन मिळुन येत नव्हता.

दरम्यान, डॉगची अधिक चौकशी केली असता, श्यामराव धोत्रे याने डॉगसोबत अनैसर्गिक संभोग केला आहे. तेंव्हा पासुन सदरचा डॉग हा बाहेर आला नसुन तो आजारी आहे. अशी माहिती मिळाली. तसेच तेथील एका इसमाने एक व्हिडीओ पाठविला आहे. त्यामध्ये एक इसम या डॉग सोबत अनैसर्गीक संभोग करत असल्याचे दिसुन आले आहे.

डॉग सोबत अनैसर्गीक संभोग करून त्याचे स्वास्थ बिघडवुन छळ केला आहे. प्राण्यास वेदना व यातना होतील असे कृत्य केले आहे. अशी तक्रार शिंदे यांनी चतुःश्रृंगी पोलिस ठाण्यात दिली आहे. गुन्हा दाखल होताच चतुःश्रृंगी पोलिसांनी तत्काळ आरोपी श्यामराव धोत्रे याला अटक केली आहे.







