Pune Crime News पुणे : तरुणाने लग्नाची मागणी (Insistence on marriage from young man) घातली असता तरुणीने त्यास नकार दिल्यानंतर (After the rejection) तरूण हट्टाला पेटला. त्यानंतर तरुणाने लग्नासाठी आत्मह्त्या करण्याची धमकी देत तरुणीला समाज माध्यमांवरून मॅसेजकरून (message on Insta and gave trouble) त्रास देण्यास सुरुवात केली. याला कंटाळून तरुणीने पोलीस ठाणे गाठले. हा प्रकार लक्ष्मीनगरमधील महाविद्यालयात जानेवारी २०२२ पासून आजपर्यंत सुरु होता. (Pune Crime News)
याप्रकरणी कात्रज येथील एका २४ वर्षाच्या तरुणीने दत्तवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यावरून अक्षय रोहिदास गुंजाळ (वय २८, रा. खंडोबा माळ, चाकण) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरुणी ही पुण्यात महाविद्यालयात शिक्षण घेते. अक्षय गुंजाळ याला ही तरुणी आवडल्याने त्याचे वडिल तरुणीच्या मामाच्या घरी गेले. त्यांनी आम्हाला तुमचे स्थळ आवडले आहे तरी बोलणी चालू ठेवा, असे सांगितले. त्यावर मामाने त्यांना सांगितले की, तीचा नकार आहे. तरीही अक्षय तरुणीचा वारंवार पाठलाग करत होता. तसेच मला तुझ्याशीच लग्न करायचे आहे. नाही तर मी आत्महत्या करेल, अशी धमकी देत होता. त्याने इन्स्टाग्रामवर तरुणीला मेसेज पाठवून स्त्री मनास लज्जा वाटेल, असे कृत्य केले. या त्रासाला कंटाळून शेवटी या तरुणीने पोलिसांकडे तक्रार दिली. पुढील तपास पोलीस करत आहेत.