पुणे : Pune Crime – व्हॉटसअॅपचा ओटीपी मागून त्याचे व्हॉट्सअॅप हॅक करून हॅक केलेल्या व्हॉट्सअॅप नंबरवरून राजकीय व्यक्तींना खंडणी मागणाऱ्या एकाला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. (Pune Crime) राजकीय, प्रतिष्ठीत व्यावसायिकांना खंडणी मागणार्या खंडणी मागणार्या आरोपीचे पुढील टार्गेट हे शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे, काँग्रेसचे आमदार संग्राम थोपटे, माजी महापौर मुरलीधर मोहोळ, माजी नगरसेवक श्रीनाथ भिमाले, साईनाथ बाबर असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. (Pune Crime)
आरोपीचे नाव शाहनवाज खान
शाहनवाज गाझीय खान (वय-३१, रा. मका मस्जिदजवळ, गरूवार पेठ सध्या रा. कोंढवा बुद्रुक) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. गुन्हे शाखेने वेळीच जेरबंद करून त्याचा डाव उधळून लावला. त्याच्याकडील चौकशीत आणि तांत्रिक विश्लेषणावरून हा प्रकार समोर आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शाहनवाज हा वेगवेगळ्या व्हॉट्सअॅप मॅरेज ब्युरो ग्रुपमध्ये सहभागी असून तो स्वतःच्या डीपीला महिलेचा फोटो लावुन ग्रुपमधील लोकांशी चॅटींग करीत होता. स्वतः महिला असल्याचे भासवून समोरच्या व्यक्तीकडून व्हॉटसअॅपचा ओटीपी मागून त्याचे व्हॉट्सअॅप तो हॅक करत होता. त्याच हॅक केलेल्या व्हॉट्सअॅप नंबरवरून तो राजकीय व्यक्तींना खंडणी मागत होता.
अशा पध्दतीने माजी नगरसेवक दिपक मिसाळ, मनसे नेते वसंत मोरे यांचा मुलगा रूपेश, व्यावसायिक अनुज गोयल, माजी नगरसेवक अविनाश बागवे, आमदार महेश लांडगे यांना खंडणीच्या जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न केला. दरम्यान त्याने हे कृत्य केवळ एका तरूणीला व तिच्या घरच्यांना त्रास देण्यासाठी केल्याचे समोर आले आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune Crime : पुण्यात एकतर्फी प्रेमातून तरुणाने स्वत:च्या पोटावर केले वार अन्…
Loni Kalbhor Crime : उरुळी देवाची येथे अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या आरोपीला २ वर्षाची शिक्षा…!