पुणे : pune Crime – पुण्यात कोयत्याचा धाक दाखवून लुटण्याचे वारंवार घडताना दिसून येत आहे. नाना पेठेत भरदिवसा कोयत्याचा धाक दाखवत व्यापाऱ्याला लुटल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 47 लाख 26 हजार रूपये आणि 14 चेक मोटारसायकलवरून आलेल्या चोरटयांनी लुटले आहेत. (pune Crime)
मंगलपूरी भिमकपूरी गोस्वामी (55, रा. मंगळवार पेठ, पुणे) यांनी समर्थ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, गोस्वामी हे पन्ना एजन्सी या दुकानात नोकरी करतात. दुकानातील व्यवसायाची एकुण रक्कम 47 लाख 26 हजार रूपये आणि 14 हे एका पिवळसर रंगाच्या बॅगमध्ये घेऊन गोस्वामी हे अॅक्टीव्हावरून घेऊन जात होते. गुरूवारी सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास ते नाना पेठेतील सिटी सर्व्हे नंबर 395 ब येथील सार्वजनिक रस्त्यावरून जात असताना काळया रंगाच्या दुचाकीने त्यांना मागुन धक्का दिला.
त्यानंतर चोरटयांनी त्यांची गाडी फिर्यादीच्या समोर आडवी घालून त्यांना हाताने मारहाण केली. लोखंडी हत्याराचा धाक दाखवुन गोस्वामी यांच्याकडील बॅग आणि त्यामध्ये असलेली रोख रक्कम आणि चेक हे जबरदस्तीने लुटले. काही क्षणातच चोरटयांनी तेथून पळ काढला. पोलिस अधिक तपास करत आहेत.