Wednesday, September 9, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

‘काम रखडतंय, मग व्हिडीओ काढून दबाव कशाला?’ सरकारी कार्यालयांतील वाढत्या व्हिडीओबाजीवर आत्मपरीक्षणाची गरज

विशाल कदमby विशाल कदम
Tuesday, 8 September 2026, 16:48

लोणी काळभोर, ता. 8 : आज कोण उठसूट मोबाईल काढून व्हिडीओ काढत सुटलंय? कामाला वेळ लागतोय म्हणून थेट कॅमेरा सुरू करायचा, दबाव आणायचा आणि अधिकारी-कर्मचाऱ्यांना धारेवर धरायचं, हा प्रकार सध्या अनेक ठिकाणी पाहायला मिळत आहे. मात्र, व्हिडीओ काढून काम लवकर होण्याऐवजी उलट कामाचा वेग मंदावतोय का, याचा विचार करण्याची वेळ आली आहे.

पुणे महानगरपालिका, नगरपालिका, क्षेत्रीय कार्यालये, खरेदी-विक्री कार्यालये, स्थानिक स्वराज्य संस्थांपासून पोलीस ठाणे, प्रवास कार्यालये, बँका आणि विविध शासकीय, निमशासकीय व खासगी सेवा संस्थांमध्ये नागरिकांची कामे असतात. अनेक नागरिकांची कामे आधीच प्रलंबित असतात. त्यातच प्रत्येकाला आपले काम आधी व्हावे, अशी अपेक्षा असते. त्यामुळे कार्यालयातील अधिकारी-कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण असतानाच, ‘माझं काम आधी करा’ या आग्रहातून निर्माण होणारा दबाव परिस्थिती अधिक गुंतागुंतीची करतो.

एखाद्या अधिकाऱ्याने ‘कामाला वेळ लागेल’ असे सांगितले की, काही तक्रारदार तातडीने मोबाईल बाहेर काढतात. व्हिडीओ सुरू होतो, प्रश्नांची सरबत्ती होते आणि वातावरण तणावपूर्ण बनते. परिणामी, अधिकाऱ्यांसमोर असलेली इतर कामेही बाजूला पडतात. ज्या कामाला काही वेळ लागणार होता, त्यालाच अधिक वेळ लागू शकतो. त्यामुळे नागरिकांनीही संयमाने भूमिका घेणे गरजेचे आहे.

अधिकारी म्हणजे कोणाच्याही दबावाला बळी पडणारी व्यक्ती नव्हे!

शासकीय कार्यालयात येणारा प्रत्येक नागरिक महत्त्वाचा आहे. तो सामान्य नागरिक असो, राजकीय नेता असो, वकील, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ता किंवा कोणत्याही संस्थेचा पदाधिकारी असो; नियम सर्वांसाठी समान असले पाहिजेत. मात्र, कामाला वेळ लागतोय म्हणून थेट मोबाईल कॅमेरा सुरू करून दबाव आणणे, धमकीवजा भाषा वापरणे किंवा अधिकाऱ्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न करणे, हा योग्य मार्ग नाही.

 

एखाद्या अधिकाऱ्याने तक्रारीची दखल घेतली नाही, काम प्रलंबित ठेवले किंवा अनावश्यक विलंब केला, तर त्याविरोधात वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार करता येते. तक्रारीचा अधिकार नागरिकांना आहे; पण तक्रार करण्याची पद्धतही तितकीच महत्त्वाची आहे. त्यामुळे नागरिकांनीही समजुतीने आणि नियमांच्या चौकटीत राहून आपली बाजू मांडली पाहिजे.

पोलीस ठाण्यांतील व्हिडीओबाजीवरही विचार करण्याची गरज

पोलीस ठाण्यांमध्ये सध्या विविध कारणांनी व्हिडीओ व्हायरल होताना दिसतात. मात्र, पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांवर बंदोबस्त, दिवसपाळी-रात्रपाळी, सण-उत्सव, नेत्यांचे ताफे, तपास आणि इतर अनेक जबाबदाऱ्या असतात. या सगळ्या कामांमध्ये ते आधीच व्यस्त असतात. त्यातच प्रत्येक गोष्टीवर व्हिडीओ काढून दबाव आणला, तर काम करण्याचे वातावरण अधिक तणावपूर्ण होऊ शकते.

अधिकारी-कर्मचाऱ्यांकडूनही नागरिकांशी सौजन्याने वागणे, तक्रारींची योग्य दखल घेणे आणि कामकाजात पारदर्शकता ठेवणे अपेक्षित आहे. मात्र, नागरिकांनीही ‘काम होत नाही म्हणून व्हिडीओ’ हा एकमेव मार्ग समजण्याऐवजी, संवाद, तक्रार निवारणाची प्रक्रिया आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे दाद मागण्याचा मार्ग स्वीकारला पाहिजे.

दरम्यान,व्हिडीओ काढणे हा अधिकार असू शकतो; पण त्याचा वापर दबाव, धमकी किंवा कामात अडथळा निर्माण करण्यासाठी होऊ नये. नागरिक आणि अधिकारी-कर्मचारी यांच्यात परस्पर सन्मान, संयम आणि समजूतदारपणा असेल, तरच शासकीय कामकाज अधिक सुरळीत होईल. त्यामुळे ‘माझं काम आधी’ या आग्रहापेक्षा ‘सर्वांचं काम नियमानुसार’ हा विचार महत्त्वाचा आहे.

 

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पुण्यात नव्या ‘MH 61’ मालिकेची धूम; अवघ्या ७ दिवसांत दुचाकींची सिरीज संपली, ‘९’ नंबरसाठी ३ लाखांहून अधिक बोली

Tuesday, 8 September 2026, 22:50

गणेशोत्सवातील मद्यविक्रीबंदीच्या नियमात तफावत! पुण्यात फक्त ३ पोलीस ठाण्यांच्या हद्दीतच ‘ड्राय डे’; पुणे पोलिसांच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह

Tuesday, 8 September 2026, 22:07

घरातल्यांचा विरोध असतांनाही प्रेमविवाह केला! पुण्यात भररस्त्यात मुलीच्या भावाकडून तरुणावर जीवघेणा हल्ला; रस्त्यात गाठलं अन्….

Tuesday, 8 September 2026, 21:15

बारामतीत लाचेचा पर्दाफाश! क्लासेसवर कारवाई न करण्यासाठी पोलीस हवालदाराने मागितली तब्बल ७ लाखांची लाच; ACB कडून रंगेहाथ अटक

Tuesday, 8 September 2026, 20:19

मोदींच्या कार्यक्रमस्थळी खळबळ; बनावट PMO अधिकारी अन् बंदूकधारी बॉडीगार्ड ताब्यात

Tuesday, 8 September 2026, 20:01

संतोष पंडितांवर कायदेशीर कारवाईचा फास घट्ट!कोर्टात हजेरीनंतर आता कारागृहात रवानगी,प्रकरणाला नवं वळण!

Tuesday, 8 September 2026, 19:47
Next Post

कात्रज-कोंढवा रस्त्यावर दुचाकी-कंटेनरचा भीषण अपघात! जुळ्या बहिणींपैकी एकीचा मृत्यू, दुसरी गंभीर जखमी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp