Wednesday, August 19, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

‘त्यांच्या पक्षाचं स्टेटस तू का ठेवलं?’ राजकीय मतभेदांतून मित्रांनीच केला घात; वेताळ टेकडीवर नेऊन हातोडा डोक्यात घातला अन्….

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Wednesday, 19 August 2026, 19:49

पुणे: पुण्यात सोशल मीडियावरील एका स्टेटसवरून दोन मित्रांनी आपल्याच मित्राची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विरोधी राजकीय पक्षाच्या समर्थनार्थ व्हॉट्सॲप स्टेटस का ठेवले, या किरकोळ कारणावरून दोन अल्पवयीन मुलांनी आपल्या मित्राला वेताळ टेकडीवर नेऊन त्याच्या डोक्यात हातोड्याने वार केल्याचा आरोप आहे. या हल्ल्यात तरुणाचा मृत्यू झाला असून, कोथरूड पोलिसांनी दोन्ही अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेतले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मृत तरुण आणि दोन्ही आरोपी एकमेकांचे मित्र होते. मात्र, तिघांचे राजकीय विचार वेगवेगळे होते. काही दिवसांपासून मृत तरुण सोशल मीडियावर विरोधी पक्षाच्या समर्थनार्थ स्टेटस ठेवत होता. यावरून आरोपींचा त्याच्याशी वाद सुरू झाला होता. स्टेटस ठेवण्यावरून वारंवार चर्चा आणि वाद होत असल्याचे सांगितले जात आहे.

याच रागातून आरोपींनी मृत तरुणाला विश्वासात घेऊन वेताळ टेकडी परिसरात नेले. तेथे पुन्हा याच मुद्द्यावरून तिघांमध्ये वाद झाला. वाद वाढल्यानंतर दोन्ही आरोपींनी हातोड्याने त्याच्या डोक्यावर जोरदार वार केल्याचा आरोप आहे. गंभीर दुखापत झाल्याने तरुणाचा मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच कोथरूड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी तपास सुरू करून दोन्ही अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले असून, त्यांच्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

सोशल मीडियावरील मतभेद आणि राजकीय विचारांमधील फरक इतका टोकाला जाऊ शकतो, की त्यातून थेट जीवघेणा हल्ला घडतो, ही बाब या घटनेमुळे पुन्हा अधोरेखित झाली आहे. विशेष म्हणजे, पुण्यात काही दिवसांपूर्वी सोशल मीडिया रील्सशी संबंधित वादातून अथर्व जगतापवर जीवघेणा हल्ला झाल्याची घटना समोर आली होती. त्यानंतर आता आठवड्याभरातच सोशल मीडिया आणि राजकीय मतभेदाच्या पार्श्वभूमीवर हत्येची घटना घडल्याने शहरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास कोथरूड पोलीस करत आहेत.

 

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

वडगाव निंबाळकर पोलिसांची धडक कारवाई! जबरी चोरीच्या सराईत टोळीतील चौघे जेरबंद; ११ लाखांचा मुद्देमाल जप्त

Wednesday, 19 August 2026, 22:55

मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला सज्जड दम; २९ ऑगस्टपासून अंतरवाली सराटीत पुन्हा आमरण उपोषण

Wednesday, 19 August 2026, 22:18

भोर पंचायत समिती सभापतींच्या पुढाकाराने भोर-महाड रस्त्यावरील खड्डे भरण्याला सुरुवात; अपूर्ण मोऱ्यांची कामे लवकरच होणार, नागरिकांनी सोडला सुटकेचा निःश्वास

Wednesday, 19 August 2026, 22:16

शिंदेवाडी पुलाखाली ट्रकची दुचाकीला पाठीमागून धडक; तरुणीचा मृत्यू, दोघे जखमी

Wednesday, 19 August 2026, 22:06

भोंगवलीत घरासमोर पार्क केलेली दुचाकी चोरीला; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल

Wednesday, 19 August 2026, 21:51

गाऊडदरा येथे जमिनीच्या वादातून मारहाण; दोन्ही बाजूंकडून परस्परविरोधी तक्रारी दाखल

Wednesday, 19 August 2026, 21:48
Next Post

भांबवडे येथे जमिनीच्या वादातून घरात घुसून मारहाण; ११ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.