Wednesday, September 9, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुण्यात पुन्हा पाणी कपात! उद्यापासून शहरात पुन्हा दिवसाआड पाणीपुरवठा; धरणांतील साठा १५ टक्क्यांनी घटला

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Tuesday, 14 July 2026, 17:23

पुणे: पुणेकरांना पुन्हा एकदा पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमधील पाणीसाठा अपेक्षेइतका वाढला नसल्याने पुणे महापालिकेने उद्यापासून शहरात दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे नागरिकांना पाण्याचा जपून वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

यंदा मान्सूनच्या सुरुवातीला अपेक्षेप्रमाणे पाऊस न झाल्याचा परिणाम खडकवासला धरण प्रकल्पातील पाणीसाठ्यावर झाला आहे. खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर या चारही धरणांमध्ये सध्या एकूण 57.85 टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत हा साठा 72.89 टक्के होता. म्हणजेच यंदा धरणांतील पाणीसाठा लक्षणीय प्रमाणात कमी आहे.

आषाढी वारीच्या काळात लाखो वारकरी पुण्यात दाखल झाल्यामुळे नागरिकांसह वारकऱ्यांना पुरेसा पाणीपुरवठा व्हावा, यासाठी महापालिकेने काही दिवस पाणीकपात स्थगित केली होती. मात्र, धरणांमधील सध्याची परिस्थिती लक्षात घेऊन पुन्हा दिवसाआड पाणीपुरवठा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

सध्या खडकवासला धरणात 93.31 टक्के, पानशेतमध्ये 60.63 टक्के, वरसगावमध्ये 55.41 टक्के, तर टेमघर धरणात केवळ 39.43 टक्के पाणीसाठा आहे. विशेषतः टेमघर धरणातील कमी साठ्यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे.

 

हवामान विभागाच्या अंदाजानुसार 20 जुलैनंतर पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. मात्र, तोपर्यंत पाण्याची उपलब्धता लक्षात घेऊन पाणीकपात कायम ठेवण्यात येणार आहे. धरणे पूर्ण क्षमतेने भरल्यानंतरच या निर्णयाचा फेरविचार केला जाईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

महापालिकेने नागरिकांना पाण्याचा अपव्यय टाळून काटकसरीने वापर करण्याचे आवाहन केले असून पुढील काही दिवस पावसाकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

पुण्यात नव्या ‘MH 61’ मालिकेची धूम; अवघ्या ७ दिवसांत दुचाकींची सिरीज संपली, ‘९’ नंबरसाठी ३ लाखांहून अधिक बोली

Tuesday, 8 September 2026, 22:50

गणेशोत्सवातील मद्यविक्रीबंदीच्या नियमात तफावत! पुण्यात फक्त ३ पोलीस ठाण्यांच्या हद्दीतच ‘ड्राय डे’; पुणे पोलिसांच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह

Tuesday, 8 September 2026, 22:07

घरातल्यांचा विरोध असतांनाही प्रेमविवाह केला! पुण्यात भररस्त्यात मुलीच्या भावाकडून तरुणावर जीवघेणा हल्ला; रस्त्यात गाठलं अन्….

Tuesday, 8 September 2026, 21:15

बारामतीत लाचेचा पर्दाफाश! क्लासेसवर कारवाई न करण्यासाठी पोलीस हवालदाराने मागितली तब्बल ७ लाखांची लाच; ACB कडून रंगेहाथ अटक

Tuesday, 8 September 2026, 20:19

मोदींच्या कार्यक्रमस्थळी खळबळ; बनावट PMO अधिकारी अन् बंदूकधारी बॉडीगार्ड ताब्यात

Tuesday, 8 September 2026, 20:01

संतोष पंडितांवर कायदेशीर कारवाईचा फास घट्ट!कोर्टात हजेरीनंतर आता कारागृहात रवानगी,प्रकरणाला नवं वळण!

Tuesday, 8 September 2026, 19:47
Next Post

लोणी काळभोरला रिक्षातून चाललेल्या महिलेच्या बॅगेतील रोख रकमेसह 6 लाखांच्या सोन्या-चांदीच्या दगिन्यांवर महिला चोरट्यांनी मारला डल्ला

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp