पुणे: पुण्याच्या विश्रांतवाडी भागातून फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. येथे शेअर बाजारात गुंतवणुकीच्या अमिषाने फसवणूक केल्याचे समोर आले आहे. सायबर चोरट्यांनी गुंतवणुकीच्या आमिषाने 38 लाख 64 हजार रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने चोरट्यांनी 38 लाख 64 हजार रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी विश्रांतवाडी पोलिसांनी सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. फसवणूक झाल्यानंतर एका 52 वर्षीय तक्रारदाराने विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. संबंधित तक्रारदार विश्रांतवाडीतील टिंगरेनगर भागात वास्तव्यास आहेत. सायबर चोरट्यांनी तक्रारदारच्या मोबाइलवर गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात संदेश पाठिवला होता. तुम्ही शेअर बाजारामध्ये गुंतवणूक केली तर चांगला परतावा मिळेल. अशा प्रकारचे आमिष चोरट्यांनी त्यांना दाखविले होते.
तक्रारदारने सुरुवातीला त्यांनी काही रक्कम गुंतविली. सुरुवातीला गुंतवणूक केल्यानंतर चोरट्यांनी त्यांना परतावाही दिला. यामुळे तक्रारदाराचा विश्वास बसला. मात्र त्यानंतर चोरट्यांनी त्यांना आणखी रक्कम गुंतवायला सांगितली. त्यानंतर सांगितल्यानुसार तक्रारदाराने महिभानरात आणखी रक्कम गुंतविली. यानंतर मात्र चोरट्यांनी त्यांना परतावा दिला नाही. त्यांनी नंतर त्यांचे मोबाइल बंद केले. आपली फसवणूक झाल्याचे तक्रारदारच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांमध्ये तक्रार दिली. याप्रकरणी गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक मंगेश हांडे तपास करत आहेत.