Saturday, November 21, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुण्यातील 12 रुग्णालयांकडून धर्मादाय कायद्याचे उल्लंघन; धक्कादायक माहिती आली समोर…

Santosh Mundeby Santosh Munde
Thursday, 1 May 2025, 1:39

पुणे : पुण्यातील नामांकित दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात गर्भवतीच्या मृत्यूनंतर जिल्ह्यातील धर्मादाय रुग्णालयांनी किती रुग्णांना सेवा दिली, याविषयी प्रश्न उपस्थित झाले होते. त्यानंतर आता धर्मादाय आयुक्त कार्यालयातून याबाबतची आकडेवारी समोर आली आहे. गेल्या वर्षामध्ये पुणे शहरातील 58 पैकी 12 रुग्णालयांनी एकाही गरीब रुग्णासाठी बेड राखीव ठेवले नसल्याचे समोर आले आहे. तसेच नियमानुसार गरीब रुग्णांवर कमी दरामध्ये किंवा मोफत उपचार केले नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

याबाबत धर्मादाय आयुक्त कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, जानेवारी ते डिसेंबर 2024 एका वर्षात पुणे जिल्ह्यातील 86 हजार 826 रुग्णांवर उपचार करण्यात आलेले आहेत. यामध्ये सर्वाधिक जास्त उपचार सिंहगड डेंटल महाविद्यालयात करण्यात आल्याचे समोर आले आहेत. तर दीनदयाल मेमोरियल हॉस्पिटल, एन. ए. वाडिया हॉस्पिटलसह इतर 12 रुग्णालयांनी एकाही रुग्णावर मोफत उपचार केले नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

पुणे शहरासह जिल्ह्यातील 58 रुग्णालयांची नोंद धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडे आहे. धर्मादाय रुग्णालयांमध्ये गरीब रुग्णांवर मोफत उपचार केले जातात. यासाठी 10 टक्के खाटा राखीव ठेवण्याचा नियम आहे. मात्र, याबाबत रुग्णालयांत याची माहिती दिली जात नसल्यामुळे गरीब व गरजू रुग्ण या योजनेपासून वंचित राहत आहेत. योजनेअंतर्गत असणाऱ्या रुग्णालयातील एकूण खाटांपैकी 10 टक्के खाटा गरीब व गरजुंसाठी राखीव ठेवाव्या लागतात. या योजनेचा लाभ घेणाऱ्या रुग्णांना उपचार, जेवण, कपडे, बेड व डॉक्टरची सेवा मोफत किंवा सवलतीच्या दरात दिली जाते. किंवा देणे बंधनकारक आहे. तसेच या रुग्णांकडून अनामत रक्कम जमा करून घेण्यासही मनाई आहे. या योजनेवर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्ह्याच्या धर्मादाय आयुक्तांसह जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्याधिकारी आदींची समिती काम करत असते.

तसेच, वर्षभरात रुग्णालयात गरजू रुग्णांकडून जमा होणाऱ्या एकूण बिलांपैकी 2 टक्के रक्कम धर्मादाय योजनेतून उपचारासाठी राखून ठेवने गरजेचे आहे. मात्र रुग्णालये सर्रासपणे रोखीने बिले घेत असल्याचं वास्तव समोर आलं आहे. पुणे शहरासह जिल्ह्यात हजारो कोटींची उलाढाल होणाऱ्या रुग्णालयात वर्षभरात केवळ 86 हजार 826 रुग्णांना उपचार करण्यात आले आहेत.

धर्मादाय कायद्याचे उल्लंघन करणारी रुग्णालये

रत्ना मेमोरियल हॉस्पिटल, हरजीवन हॉस्पिटल, महात्मा गांधी नेत्र रुग्णालय, जोशी हॉस्पिटल,दीनदयाळ मेमोरियल हॉस्पिटल, एन एम वाडिया हॉस्पिटल, मातोश्री मदनबाई धारीवाल हॉस्पिटल, काशीबाई नवले जनरल हॉस्पिटलहॉस्पिटल परमार हॉस्पिटल, गिरीराज हॉस्पिटल, डॉ. जल मेहता रुरल क्रिटिकल केअर सेंटर

धर्मादायचा नियम नेमकं काय सांगतो?

नियमानुसार धर्मादाय आयुक्तांच्या निर्देशांनुसार संबंधित रुग्णालयावर ‘धर्मादाय’ असा स्पष्ट उल्लेख करणे अपेक्षित असते. गरीब व गरजू रुग्णांसाठी 10 टक्के खाटा राखीव असल्याचा फलक रूग्णालयात लावणे आवश्यक. तसेच या योजनेची माहिती देण्यासाठी स्वतंत्र प्रतिनिधी आणि त्याचा संपर्क क्रमांक प्रदर्शित करणे आवश्यक आहे.

Santosh Munde

Santosh Munde

संतोष मुंडे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून (रानडे इन्स्टिट्यूट) पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. पुण्यातील नामवंत कोचिंग क्लासेससाठी स्क्रिप्ट रायटर आणि अँकर तसेच 'सोशल मीडिया मॅनेजर' म्हणून दोन वर्ष कार्यरत. वेब डेव्हलपमेंट आणि SEO एक्स्पर्ट. जानेवारी 2025 पासून 'पुणे प्राईम न्यूज' मध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत.

ताज्या बातम्या

राज्यातील शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी! कर्जमुक्तीच्या दुसऱ्या टप्प्यातील १ लाख ६९ हजार ८२० पात्र शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

Friday, 20 November 2026, 23:02

मारुंजी येथे तारेचे कुंपण घालण्याच्या वादातून तरुणावर धारदार हत्याराने हल्ला; बाप-लेकाविरुद्ध हिंजवडी पोलिसांत गुन्हा दाखल!

Friday, 20 November 2026, 21:31

सिंहगडावर आता सीसीटीव्हीचा पहारा! पर्यटकांच्या हालचालींवर राहणार नजर; डिसेंबरमध्ये यंत्रणा सुरू होणार

Friday, 20 November 2026, 20:41

समृद्धी महामार्गावर शासकीय वाहनावर दगडफेक! ‘११२’ वर तीन वेळा फोन करूनही दोन तास पोलीस आलेच नाहीत

Friday, 20 November 2026, 20:04

पुणेकरांनो सावधान! वाहतूक नियम मोडणाऱ्यांची आता खैर नाही; पोलिसांची बंद केलेली ई-चलान यंत्रे पुन्हा होणार सुरू!

Friday, 20 November 2026, 19:54

तुकाराम मुंढेंचा सप्लीमेंट्सवरही प्रहार! जिममधील प्रोटीन पावडरवर कडक कारवाईचे आदेश; दिशाभूल केल्यास थेट 10 लाखांचा दंड..

Friday, 20 November 2026, 18:57
Next Post

Job Alert ! महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी येथे निघाली भरती; ऑनलाईनही करता येणार अर्ज...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp