Wednesday, October 28, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

विषारी दारूकांडाचा ‘दणका’! 22 बळी घेणाऱ्या दारू विक्रेत्याचे घर जमीनदोस्त होणार; महापालिकेची कारवाई

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Wednesday, 3 June 2026, 20:35

पुणे: पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात विषारी दारूमुळे झालेल्या मृत्यूंच्या घटनेनंतर प्रशासनाने कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. या प्रकरणात आतापर्यंत 22 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली असून, बेकायदेशीर दारू विक्री आणि संबंधित यंत्रणांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

या प्रकरणातील प्रमुख आरोपी गुरुमंगलसिंग कर्नलसिंग विरका याच्या घरावरही आता कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. संबंधित बांधकाम अनधिकृत असल्याचा दावा करत महापालिकेने त्याला नोटीस बजावली आहे. 24 तासांच्या आत स्वतःहून बांधकाम हटवावे, अन्यथा प्रशासनाकडून ते पाडण्यात येईल, असा इशारा नोटीसमध्ये देण्यात आला आहे.

घटनेनंतर परिसरात शोक आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. स्थानिक नागरिकांनी, विशेषतः महिलांनी, अनेक वर्षांपासून परिसरात बेकायदेशीर दारू विक्री सुरू असल्याचा आरोप केला आहे. याबाबत वेळोवेळी पोलिसांकडे तक्रारी करण्यात आल्या होत्या. मात्र, कारवाई केवळ तात्पुरती होत असे आणि काही दिवसांनंतर पुन्हा दारू विक्री सुरू होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

काही स्थानिकांनी पोलिसांच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित केले आहेत. बेकायदेशीर व्यवसायाकडे दुर्लक्ष केल्यामुळेच ही गंभीर घटना घडल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. निष्पाप लोकांचा जीव गेल्यानंतर संबंधित यंत्रणांची जबाबदारी निश्चित करण्याची मागणीही होत आहे.

दरम्यान, या प्रकरणात मोठी प्रशासकीय कारवाई करण्यात आली आहे. बेकायदेशीर आणि संशयित बनावट मद्याचा पुरवठा रोखण्यात अपयश आल्याचा ठपका ठेवत पुणे पोलीस, पिंपरी-चिंचवड पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागातील एकूण 22 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.

निलंबित अधिकाऱ्यांमध्ये पोलीस निरीक्षक, दुय्यम निरीक्षक तसेच विविध विभागांतील कर्मचारी यांचा समावेश असल्याचे सांगितले जात आहे. या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू असून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.

 

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

वढू बुद्रुकमध्ये भांडण सोडवायला गेलेल्या तरुणाला काठीने मारहाण!

Wednesday, 28 October 2026, 13:51

राष्ट्रवादीत पार्थ पवारांची मोठी खेळी! उमेश पाटील, झिशान सिद्दीकींवर महत्त्वाची जबाबदारी; संघटनेत मोठे फेरबदल

Wednesday, 28 October 2026, 13:40

पुण्यात अपहरण, अत्याचाराचे गंभीर गुन्हे करून 20 वर्षं फरार! नाव-पत्ता बदलून बीडमध्ये लपला, पण अखेर पोलिसांच्या जाळ्यात…

Wednesday, 28 October 2026, 13:04

केडगाव–सुपे मार्गावरील पूल अन् घाट रस्त्याच्या कामांना गती देण्यासाठी राहुल कुल यांची मंत्र्यांसोबत बैठक

Wednesday, 28 October 2026, 13:02

आघाडी 8,852 मतांची अन् हर्षदा देशमुख-जाधव यांना विजयासाठी 1,816 मतांचं आव्हान; पुणे पदवीधरचा निकाल कोणत्या वळणावर?

Wednesday, 28 October 2026, 12:42

“घरात पैसे टाकले, संस्थांवर दबाव आणला!” पुणे शिक्षक मतदारसंघाच्या पराभवानंतर दत्तात्रय सावंतांचा गंभीर आरोप..

Wednesday, 28 October 2026, 12:41
Next Post

अवघा महाराष्ट्र विठ्ठलमय! पंढरीच्या वारीचे वेध; संत तुकोबांची पालखी 'या' दिवशी होणार पंढरीकडे रवाना; वेळापत्रक जाहीर...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp