Wednesday, October 28, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

अवघा महाराष्ट्र विठ्ठलमय! पंढरीच्या वारीचे वेध; संत तुकोबांची पालखी ‘या’ दिवशी होणार पंढरीकडे रवाना; वेळापत्रक जाहीर…

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Wednesday, 3 June 2026, 21:10

पुणे: आषाढी वारीची चाहूल लागताच राज्यभरातील वारकरी पंढरपूरच्या वारीच्या तयारीला लागतात. विठ्ठल दर्शनाची ओढ आणि नामस्मरणाचा उत्साह यामुळे लाखो भाविक आषाढी एकादशीची आतुरतेने वाट पाहत असतात. यंदा आषाढी एकादशी 25 जुलै 2026 रोजी असल्याने वारीचे नियोजन सुरू झाले आहे. दरम्यान, संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून 7 जुलैपासून पालखी पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे.

संत तुकाराम महाराजांच्या 341 व्या आषाढी पायी वारी सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. 7 जुलै 2026 रोजी देहू येथील मुख्य मंदिरातून पालखी सोहळ्याला सुरुवात होणार आहे. विठ्ठल नामाचा गजर, टाळ-मृदुंगाचा नाद आणि भक्तीमय वातावरणात हजारो वारकरी पंढरपूरच्या दिशेने मार्गक्रमण करतील.

यंदाच्या पालखी सोहळ्यासाठी विक्रमसिंह मोरे, उमेश मोरे आणि लक्ष्मण मोरे यांची पालखी सोहळा प्रमुख म्हणून निवड करण्यात आली आहे. तसेच पालखी रथ आणि चौघडा गाडीसाठी तीन नवीन बैलजोड्यांचीही व्यवस्था करण्यात आली आहे. या बैलजोड्या यंदाच्या वारीत सहभागी होणार आहेत.

संत तुकाराम महाराजांच्या पालखीप्रमाणेच संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीबाबतही वारकऱ्यांमध्ये उत्सुकता आहे. आळंदीहून माऊलींची पालखी पंढरपूरकडे कधी रवाना होणार याकडेही भाविकांचे लक्ष लागले आहे. त्याचे वेळापत्रक लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे.

दरवर्षीप्रमाणे यंदाही राज्याच्या विविध भागांतून शेकडो पालख्या आणि हजारो दिंड्या पंढरपूरकडे निघणार आहेत. संत मुक्ताई, संत गजानन महाराज यांच्यासह अनेक संतांच्या पालख्या वारीत सहभागी होतात. शेगावहून निघणारी गजानन महाराजांची पालखीही वारकऱ्यांसह पायी प्रवास करते.

आषाढी एकादशीच्या दिवशी लाखो भाविक पंढरपुरात एकत्र येतात. चंद्रभागा नदीच्या तीरावर भक्तांचा महासागर पाहायला मिळतो. विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागतात आणि संपूर्ण पंढरी भक्तिरसात न्हाऊन निघते.

 

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

विद्युत रोहित्र फोडून 520 किलो तांब्याच्या तारांची चोरी; भंगार व्यवसायिकांकडे संशयाचे सुई!

Wednesday, 28 October 2026, 14:41

Daund News : ऊसतोड मजूर पुरविण्याच्या नावाखाली शेतकऱ्याची 10 लाखांची फसवणूक

Wednesday, 28 October 2026, 14:31

ट्रॅक्टर खरेदीसाठी पैसे दिले नाहीत म्हणून कुटुंबाला मारहाण; कुरकुंभमध्ये पाच जणांविरुद्ध गुन्हा

Wednesday, 28 October 2026, 14:27

रस्त्यावरून गाडी नेण्यावरून वाद; शेतकऱ्याला सहा जणांची बेदम मारहाण!

Wednesday, 28 October 2026, 14:05

वढू बुद्रुकमध्ये भांडण सोडवायला गेलेल्या तरुणाला काठीने मारहाण!

Wednesday, 28 October 2026, 13:51

राष्ट्रवादीत पार्थ पवारांची मोठी खेळी! उमेश पाटील, झिशान सिद्दीकींवर महत्त्वाची जबाबदारी; संघटनेत मोठे फेरबदल

Wednesday, 28 October 2026, 13:40
Next Post

यूपीआय वापरताय? तर मग ही बातमी तुमच्यासाठीच! खात्यातील पैसे सुरक्षित ठेवण्यासाठी आजच करा 'या' 5 सेटिंग्ज

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp