पुणे: पुण्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे दांडियामध्ये झालेल्या किरकोळ भांडणाचा राग मनात धरून अप्पर बिबवेवाडी येथे एका व्यक्तीवर कोयत्याने वार करण्यात आला आहे. जखमी व्यक्तीवर शहरातील ससून रूग्णालयात उपचार सुरू आहेत. गौरव सोनकांबळे असं वार झालेल्या तरुणाचं नाव आहे. या प्रकरणी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही घटना काल (19 ऑक्टोबर) सायंकाळी घडली आहे. याप्रकरणतील सर्व आरोपी विधि संघर्षग्रस्त बालक आहेत. त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी तीन अल्पवयीन मुलांवर बिबवेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, या प्रकरणातील तीनही अल्पवयीन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास बिबवेवाडी पोलीस करीत आहेत.







