Sunday, June 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Crime : बारावीच्या विद्यार्थ्यावर फरशीच्या तुकड्याने जीवघेणा हल्ला , तिघांविरुद्ध गुन्हा

विशाल कदमby विशाल कदम
Thursday, 23 April 2026, 11:37

Pune Crime हडपसर, ता. 23 : मगरपट्टा परिसरातील तुपे कॉर्नर येथे एका २० वर्षीय विद्यार्थ्यावर तिघा अज्ञात तरुणांनी फरशीच्या तुकड्याने हल्ला करत बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी (ता. 21 एप्रिल) मध्यरात्री घडली आहे. या हल्ल्यात विद्यार्थी गंभीर जखमी झाला असून सध्या त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. Pune Crime

सिद्धार्थ वसंत वाघमारे (वय 20, रा. शिंदेवस्ती, मगरपट्टा वेस्ट गेट, हडपसर) असे जखमी झालेल्या विद्यार्थ्यांचे नावे आहे. तर तीन अज्ञात तरुणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , सिद्धार्थ वाघमारे याने 12वीची परीक्षा दिलेली आहे. तो मित्र अवधूत सकट (वय 19) याला भेटण्यासाठी गेला होता. त्यानंतर रात्री उशिरा अवधूत सकट व युवराज कांबळे (वय 19) हे दोघे त्याला घरी सोडण्यासाठी निघाले. Pune Crime

 

दरम्यान, महादेव मंदिराजवळ अॅमनोराच्या मागील बाजूस काही ओळखीच्या व्यक्तींनी त्यांना थांबवले व “मित्राची किरकिरी झाली आहे” असे सांगत तुपे कॉर्नर येथील झेप्टो स्टोअरकडे घेऊन गेले. तेथे सिद्धार्थ बाहेर थांबलेला असताना अचानक तीन अनोळखी तरुण तोंडावर मास्क घालून आले आणि कोणतीही पूर्वसूचना न देता त्याच्यावर हल्ला चढवला. हल्लेखोरांपैकी एकाने फरशीच्या तुकड्याने सिद्धार्थच्या डोक्यावर जोरदार प्रहार केला. त्यामुळे तो खाली कोसळला. त्यानंतर आरोपींनी त्याच्या छातीवर लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. Pune Crime

या मारहाणीत सिद्धार्थच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन नाकातून व डोक्यातून रक्तस्त्राव सुरू झाला. काही वेळ तो अर्धबेशुद्ध अवस्थेत होता. घटनेनंतर मित्र अवधूत सकट याने तात्काळ त्याला रुग्णालयात दाखल केले. सध्या त्याच्यावर माळवाडी येथील मेडिकेअर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असून तो शुद्धीवर आला आहे. या प्रकरणी सिद्धार्थ वाघमारे यांनी दिलेल्या तक्रारीवरून तिघा अज्ञात तरुणांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 118(1) आणि 3(5) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून हल्लेखोरांचा शोध सुरू असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास वेगाने सुरू आहे. Pune Crime

 

 

 

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

Pune News : तुळापूरमध्ये मध्यरात्री ‘रेव्ह पार्टी’वर पोलिसांचा छापा ; 60 ते 70 तरुण-तरुणी ताब्यात, अमली पदार्थांचा संशय

Sunday, 7 June 2026, 10:40

वाळू माफिया आणि तहसीलदारांचे 6 लाखांत केले साटेलोटे; लाच स्वीकारताना तहसीलदार विजय चव्हाण एसीबीच्या जाळ्यात

Saturday, 6 June 2026, 20:47

अवैध मद्यविक्रीचे जाळे उध्वस्त करणार; पुणे-पिंपरी-चिंचवड आणि ग्रामीण पोलिसांची धडक मोहीम

Saturday, 6 June 2026, 20:11

पुणे-सातारा महामार्गावर ‘बर्निंग कार’चा थरार; काही मिनिटांतच गाडी जळून खाक, सर्व प्रवासी सुखरूप

Saturday, 6 June 2026, 19:42

प्रेयसीच्या प्रेमात पत्नीला विसरला पती; दोन मुलांच्या आईचा शारीरिक व मानसिक छळ, पतीविरुद्ध गुन्हा दाखल

Saturday, 6 June 2026, 19:29

पुण्यात टपऱ्या आणि हातगाड्यांना रात्री 10 वाजेपर्यंत, तर परवानाधारक दुकाने 24 तास सुरू ठेवण्यास परवानगी; पोलिसांकडून व्यापाऱ्यांना दिलासा

Saturday, 6 June 2026, 19:14
Next Post
CREATOR: gd-jpeg v1.0 (using IJG JPEG v62), quality = 82

Sasvad Crime News : किरकोळ कारणावरून दोन गटात तुंबळ हाणामारी ; परस्परविरोधी गुन्हे दाखल, खुनाचा प्रयत्न केल्याचा दोन्ही बाजूंचा आरोप

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.