Sunday, June 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Hadapsar News : लोखंडी घसरगुंडी अंगावर पडून ४ वर्षांच्या चिमूकलीचा दुर्दैवी मृत्यू, चेअरमन आणि कार्यकारिणी सदस्यांविरुद्ध गुन्हा

विशाल कदमby विशाल कदम
Thursday, 23 April 2026, 11:10

Hadapsar News हडपसर, ता. 23 : हडपसर मगरपट्टा परिसरातील वेदविहार सोसायटीत निष्काळजीपणाचा धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला असून, असुरक्षित आणि योग्य प्रकारे न बसवलेल्या लोखंडी घसरगुंडीमुळे ४ वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणी सोसायटीचे चेअरमन आणि कार्यकारिणी सदस्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Hadapsar News अनिका (वय 4.5) असे मृत्यू झालेल्या मुलीचे नाव आहे. याप्रकरणी नवनाथ पांडुरंग देवीकर (वय 34) यांनी हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नवनाथ देवीकर) हे आपल्या कुटुंबासह वेदविहार सोसायटी येथे वास्तव्यास आहेत. ते आयटी कंपनीत नोकरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. 7 एप्रिल रोजी सकाळी ते नेहमीप्रमाणे कामावर गेले असताना दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास त्यांची मुलगी अनिका (वय 4.5) शाळेतून घरी आल्यानंतर सोसायटीच्या आवारात खेळण्यासाठी गेली. Hadapsar News

 

यावेळी सोसायटीच्या मोकळ्या जागेत रस्त्याच्या कडेला ठेवलेली आणि व्यवस्थित फिट न केलेली लोखंडी घसरगुंडी अचानक हलली आणि थेट अनिकाच्या डोक्यावर व मानेवर कोसळली. या भीषण अपघातात अनिका गंभीर जखमी होऊन जागीच बेशुद्ध पडली. घाबरलेल्या आईने आणि स्थानिक नागरिकांनी तिला तात्काळ जवळील खासगी रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयात अनिकावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. तब्बल आठ दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर 15 एप्रिल रोजी दुपारी 4.41 वाजता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. या घटनेने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.  Hadapsar News

दरम्यान, सोसायटीच्या हलगर्जीपणामुळे एका निरागस चिमुकलीचा जीव गमवावा लागल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. “सुरक्षेच्या मूलभूत गोष्टींकडे दुर्लक्ष करून कोण जबाबदार?” असा सवाल उपस्थित केला जात आहे. या प्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 106 आणि 3(5) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

वारंवार तक्रारी; तरीही प्रशासन गप्प!
या घटनेतील सर्वात गंभीर बाब म्हणजे, ही लोखंडी घसरगुंडी अनेक दिवसांपासून योग्य प्रकारे बसवलेली नव्हती. सोसायटीतील रहिवाशांनी याबाबत चेअरमन व कार्यकारिणी सदस्यांना वारंवार तक्रारी करून “दुर्घटना होऊ शकते” असा इशाराही दिला होता. मात्र, सोसायटी प्रशासनाने या तक्रारींकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे. या घटनेनंतर सोसायटीमधील सुरक्षेच्या उपाययोजनांबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले असून, अशा प्रकारच्या निष्काळजीपणामुळे आणखी किती निष्पाप जीवांचा बळी जाणार, असा संतप्त सवाल नागरिकांकडून विचारला जात आहे. Hadapsar News

 

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

Pune News : तुळापूरमध्ये मध्यरात्री ‘रेव्ह पार्टी’वर पोलिसांचा छापा ; 60 ते 70 तरुण-तरुणी ताब्यात, अमली पदार्थांचा संशय

Sunday, 7 June 2026, 10:40

वाळू माफिया आणि तहसीलदारांचे 6 लाखांत केले साटेलोटे; लाच स्वीकारताना तहसीलदार विजय चव्हाण एसीबीच्या जाळ्यात

Saturday, 6 June 2026, 20:47

अवैध मद्यविक्रीचे जाळे उध्वस्त करणार; पुणे-पिंपरी-चिंचवड आणि ग्रामीण पोलिसांची धडक मोहीम

Saturday, 6 June 2026, 20:11

पुणे-सातारा महामार्गावर ‘बर्निंग कार’चा थरार; काही मिनिटांतच गाडी जळून खाक, सर्व प्रवासी सुखरूप

Saturday, 6 June 2026, 19:42

प्रेयसीच्या प्रेमात पत्नीला विसरला पती; दोन मुलांच्या आईचा शारीरिक व मानसिक छळ, पतीविरुद्ध गुन्हा दाखल

Saturday, 6 June 2026, 19:29

पुण्यात टपऱ्या आणि हातगाड्यांना रात्री 10 वाजेपर्यंत, तर परवानाधारक दुकाने 24 तास सुरू ठेवण्यास परवानगी; पोलिसांकडून व्यापाऱ्यांना दिलासा

Saturday, 6 June 2026, 19:14
Next Post

Pune Crime : बारावीच्या विद्यार्थ्यावर फरशीच्या तुकड्याने जीवघेणा हल्ला , तिघांविरुद्ध गुन्हा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.