Friday, June 12, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

भिगवणमध्ये किरकोळ वादातून सूड; दबा धरून ४६ वर्षीय व्यक्तीवर जीवघेणा हल्ला, विक्रम बाळासो माडगे व रूपाली माडगे अटकेत

सागर जगदाळेby सागर जगदाळे
Friday, 1 May 2026, 21:09

भिगवण, ता.1 : अंगणात वाळत घातलेल्या कपड्यांमधून पडलेल्या पाण्यावरून झालेला किरकोळ वाद मनात ठेवून काही दिवसांनी दबा धरून ४६ वर्षीय व्यक्तीवर जीवघेणा हल्ला केल्याची गंभीर घटना भिगवण परिसरात घडली आहे. या प्रकरणी भिगवण पोलीस ठाण्यात विक्रम बाळासो माडगे, त्यांची पत्नी रूपाली माडगे तसेच दोन अनोळखी इसम अशा एकूण चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, धनाजी उर्फ गणेश तुकाराम जमदाडे (वय ४६) यांच्या कुटुंबीयांनी काही दिवसांपूर्वी अंगणात कपडे वाळत घातले असता त्यातून पडलेले पाणी आरोपींच्या अंगावर उडाले. या किरकोळ कारणावरून दोन्ही बाजूंमध्ये वाद झाला होता. मात्र, हा वाद मनात ठेवून आरोपींनी सूडभावनेतून हल्ला केल्याचे समोर आले आहे.

२६ एप्रिल २०२६ रोजी रात्री सुमारे ८.४५ ते १० वाजण्याच्या दरम्यान जमदाडे हे रस्त्याच्या कडेला असलेल्या किराणा दुकानात काही सामान घेण्यासाठी थांबले असता, दबा धरून बसलेल्या विक्रम बाळासो माडगे व रूपाली माडगे तसेच त्यांच्या साथीदारांनी अचानक त्यांच्यावर हल्ला चढवला. आरोपींनी शिवीगाळ करत लोखंडी रॉड व कोयत्यासारख्या हत्यारांनी बेदम मारहाण केली. या हल्ल्यात जमदाडे यांच्या डोक्यासह शरीराच्या विविध भागांवर गंभीर दुखापती झाल्या.

 

घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदत करून जखमींना रुग्णालयात दाखल केले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असून प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे.

या प्रकरणी भारतीय न्याय संहिता २०२३ मधील विविध कलमांसह शस्त्र कायदा आणि अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. दरम्यान, पोलिसांनी तातडीने कारवाई करत मुख्य आरोपी विक्रम बाळासो माडगे व रूपाली माडगे या पती-पत्नीला अटक केली असून उर्वरित दोन आरोपींचा शोध सुरू आहे.

याबाबत माहिती देताना भिगवण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद महांगडे यांनी सांगितले की, “घटनेचा सखोल तपास सुरू असून उर्वरित आरोपींनाही लवकरच अटक करण्यात येईल.”

सागर जगदाळे

सागर जगदाळे

अडीज वर्ष दैनिक पुण्यनगरी काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये भिगवण येथील प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे. शैक्षणिक क्षेत्रातील बातम्या लिहिण्याचा खूप मोठा अनुभव आहे.

ताज्या बातम्या

370 ची बिर्याणी चांगलीच महागात पडली; प्रणीत मोरे आणि हिमांशू जांग्रांवर कारवाईची टांगती तलवार

Thursday, 11 June 2026, 22:54

“पेपर फुटला तर विद्यार्थ्यांचा खर्च सरकारने भरावा!” अभिजित दिपके यांची सरकारकडे जोरदार मागणी

Thursday, 11 June 2026, 22:33

शिरूर येथे वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचा धडाका; एका दिवसात 18 वाहनांवर दंडात्मक कारवाई

Thursday, 11 June 2026, 22:32

अतिक्रमण कारवाई नको असेल तर 70 हजार द्या! पिंपरी चिंचवड महापालिकेचा इंजिनिअर लाच घेताना अडकला एसीबीच्या जाळ्यात

Thursday, 11 June 2026, 22:20

ग्रामीण पुण्याचा प्रवास आता होणार ‘हायटेक’! 25 ‘राजमाता जिजाऊ’ शटल बस पुणे विभागात दाखल

Thursday, 11 June 2026, 21:42

विकृतीचा कळस! शाळकरी मुलीला गुंगीचं औषध औषध पाजलं, आळीपाळीने बलात्कार, नग्न व्हिडीओ-फोटो नातेवाईकांना पाठवले; दोन सख्ख्या भावांचा कारनामा…

Thursday, 11 June 2026, 21:10
Next Post

Loni Kalbhor : लोणी काळभोरमध्ये एचपीसीएल कंपनीच्या टँकरचालकांचा अडेलतट्टूपणा; सेवा रस्ता आणि मुख्य मार्गावरच रांगा, पोलिसांच्या कारवाईकडे सर्वांचे लक्ष

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.