Friday, July 24, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

निवडणूक होण्याआधीच निकाल! विधान परिषदेत महायुतीची मोठी बाजी; मविआला मोठा धक्का

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Thursday, 4 June 2026, 15:54

पुणे: राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांच्या विधान परिषद निवडणुकांमध्ये यंदा अनेक ठिकाणी बिनविरोध निवडीचे चित्र पाहायला मिळत आहे. राज्यातील 17 जागांसाठी निवडणूक प्रक्रिया सुरू असताना महायुतीने मतदानापूर्वीच काही जागांवर विजय निश्चित केला आहे. अनेक ठिकाणी बंडखोरी रोखण्यातही महायुतीला यश मिळाल्याचे दिसून येत आहे.

पुणे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे विक्रम संजय काकडे यांची विधान परिषदेसाठी बिनविरोध निवड झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे उमेदवार श्रीकांत पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सुनील टिंगरे तसेच भाजपचे बंडखोर उमेदवार प्रदीप कंद यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने काकडे यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला. पक्षाच्या निर्देशानुसार माघार घेतल्याचे श्रीकांत पाटील यांनी सांगितले.

वर्धा-गडचिरोली-चंद्रपूर मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार शैलेश अग्रवाल यांनी अर्ज मागे घेतल्यामुळे भाजपचे अरुण लखानी यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. त्यामुळे या मतदारसंघात निवडणुकीची गरज उरलेली नाही.

 

यवतमाळ मतदारसंघातही सर्व उमेदवारांनी माघार घेतल्याने शिवसेनेचे (शिंदे गट) दुष्यंत चतुर्वेदी यांची बिनविरोध निवड झाली आहे. विशेष म्हणजे यवतमाळच्या विधान परिषद निवडणुकीच्या इतिहासात प्रथमच अशी बिनविरोध निवड झाली आहे.

कोकण स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार बाळ माने यांनी अर्ज मागे घेतल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिकेत तटकरे यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला आहे. महायुतीच्या पाठिंब्यामुळे ही जागा बिनविरोध झाल्याची प्रतिक्रिया महायुतीच्या नेत्यांनी दिली आहे.

अर्ज माघारीनंतर राज्यातील अनेक मतदारसंघांतील निवडणूक चित्र स्पष्ट झाले असून काही ठिकाणी मतदानाची आवश्यकता राहिली नाही. तर उर्वरित मतदारसंघांमध्ये महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात थेट लढत होणार आहे.

 

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

पेपरफुटी करणाऱ्यांना आता १० वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा अन् १० कोटींचा दंड! कॅबिनेटचा सर्वात मोठा निर्णय

Friday, 24 July 2026, 21:02

शिरूरमधील प्रकार! खरेदीच्या बहाण्याने सराफ दुकानात शिरल्या अन् चार महिलांनी हातचलाखीने दागिने लांबवीले….

Friday, 24 July 2026, 20:19

पत्नीचे उत्पन्न जास्त असेल तर पोटगीचा अधिकार नाही! मुंबई उच्च न्यायालयाचा ऐतिहासिक आणि मोठा निर्णय

Friday, 24 July 2026, 19:36

‘तू मानसिक रुग्ण आहे’ म्हणत विवाहितेचा छळ; करणी-भानामतीचा प्रकार केला, डोळ्यांत लिंबू पिळले अन्….

Friday, 24 July 2026, 18:49

ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतदार याद्यांची ​24 जुलैला प्रसिद्ध होणारी प्रारूप मतदार यादी तुर्त स्थगित; सुधारित कार्यक्रम लवकरच जाहीर होणार, राज्य निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय..

Friday, 24 July 2026, 18:40

एमएनजीएलच्या कमी गॅस दाबामुळे पुण्यात सीएनजीचा खोळंबा; डीलर्सचा इशारा – २४ तासांत उपाय नाही तर सीएनजी विक्री बंद!

Friday, 24 July 2026, 18:34
Next Post

इंदापुरात FDAच्या धडक कारवाईत 2.57 लाखांचा गुटखा जप्त;अन्न व औषध प्रशासनाची इंदापूर पोलिसांसोबत संयुक्त कारवाई

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.