पुणे: पोलीस भरती प्रक्रियेत सहभागी होणाऱ्या तरुणींसाठी दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे. शारीरिक चाचणीच्या दिवशी एखाद्या महिला उमेदवाराला मासिक पाळी सुरू असल्यास तिला चाचणी पूर्ण करण्यासाठी ५ ते ६ दिवसांची अतिरिक्त मुदत दिली जाणार आहे. या निर्णयामुळे पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणींना मोठा दिलासा मिळणार आहे.

या निर्णयानुसार, संबंधित उमेदवाराची आरोग्य तपासणी करण्यात येईल. त्यानंतर आवश्यकतेनुसार तिला शारीरिक चाचणी देण्यासाठी अतिरिक्त मुदत दिली जाणार आहे. त्यामुळे मासिक पाळीमुळे शारीरिक चाचणीच्या दिवशी अडचण निर्माण झाल्यास उमेदवारांना पुन्हा संधी मिळू शकणार आहे.
पोलीस भरती प्रक्रियेत महिला उमेदवारांचा सहभाग वाढत असताना हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे. शारीरिक चाचणीच्या वेळी येणाऱ्या अडचणींचा विचार करून घेतलेल्या या निर्णयामुळे भरतीची तयारी करणाऱ्या तरुणींना दिलासा मिळणार आहे.








